Prakash Ambedkar met Deepak Kesarkar Sarkarnama
मुंबई

Deepak Kesarkar Meet Prakash Ambedkar : दीपक केसरकर अन् आंबेडकर यांच्या भेटीमागे राजकीय अजेंडा ?

Sudesh Mitkar

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवाजी पार्कवर संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला संबोधित करताना आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारला फैलावर घेतले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी सकाळी मंत्री दीपक केसरकर यांनी अचानक प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले असून या मागे कोणता राजकीय अजेंडा होता का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेले आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जाणारे दीपक केसरकर आज ( रविवारी ) सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी पोचलो. दादर येथील आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चेची खलबत रंगल्या नंतर दीपक केसरकर यांनी पत्रकरांशी बोलताना भेटी बाबत खुलासा केला. संविधान दिन असल्याने आंबेडकर यांना भेटून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले तसेच मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो असा खुलासा देखील केला. मात्र हे राजकीय नेते फक्त शुभेच्छा देण्यासाठी भेटतील का ? असा सवाल या निम्मिताने उपस्थित झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंगोली ओबीसी एल्गार परिषदेला जात असताना मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला. याबाबत विचारले असता केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, "राज्यातील अशा प्रकारचा संघर्ष थांबला पाहिजे. राज्यात शांतता नांदली तर गुंतवणूकदार महाराष्ट्रात येतील त्यामुळे हा संघर्ष टाळणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युल्या बाबत बोलताना ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. तिन्ही पक्षाचे नेते चर्चा आणि समन्वय साधून काम करत आहेत, त्यामुळे आमच्यात कोणताही वाद होणार नाही. चर्चेतून मार्ग निघतील.

महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या असणे आवश्यकच आहे. सर्वोच्च न्यायालयानं पाट्या बदलण्यासाठी पुरेशी मुदत दिली होती. त्यानंतर देखील जे मराठी पाट्या लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली करण्यात येणार आहे. तसेच जे दुकानांवरील पाट्यांना काळं फासतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. कोणी ही कायदा हातात घेणे अपेक्षेत नसल्याचे केसरकर म्हणाले.

(Edited by Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT