Lok Sabha Election :भाजपचं ठरलं ! सर्वाधिक जागा लढवणार, शिंदे-पवारांच्या हाती किती जागा ..

Devendra Fadnavis News : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ हिवाळी अधिवेशनानंतर फुटणार
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणी किती जागा लढायच्या यावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात कुरबूर चालू आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच सर्वाधिक जागा लढणार असल्याचा सुतोवाच केला आहे. त्यामुळे भविष्यात जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाकयुध रंगलेलं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा फार्मूला निश्चित झाल्याचे सांगितला आहे. या फार्मूल्यानुसार भाजप 48 पैकी 26 जागा लढवणार आहे. तर शिंदे आणि अजित पवार गट हे उर्वरित 22 जागा लढवणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर 2019 मध्ये भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या त्यात भाजपाला 23 जागा आणि शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळवता आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News
Shankarrao Gadakh News : "जनमत तयार करण्यात जिल्ह्यातील नेते कमी पडत आहेत" !

फडणवीस यांचा फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का ?

मुलाखतीमध्ये फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघाचे सर्वेक्षण आमच्याकडून करण्यात आले आहे. त्यामध्ये प्राथमिकरित्या विजय होण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी आमच्याकडे तयार आहे. मात्र गेल्यावर निवडणूक विजयी झालेला उमेदवारांना संधी देण्याची परंपरा आहे. त्यानुसार निवडणुकीपूर्वी याबाबत चर्चा आणि वाटाघाटी करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे." तरी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी तर कोकण आणि मुंबईत शिवसेनेला जास्त जागा दिल्या जाऊ शकतात. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

प्रचाराचा नारळ फुटणार

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ हिवाळी अधिवेशनानंतर फुटणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होणार आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येतील. ज्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवत असेल, त्याठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याचा प्रचार करतील. असाच नियम भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होणार असल्याचे फडणवीस यांनी संगितले.

(Edited by Sudesh Mitkar)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News
Jayakwadi Water Issue : जायकवाडीची तहान मुळा धरण भागवणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com