Devendra Fadnavis on Pune Drug Case : पुण्यात घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांवरून सध्या राजकारण चांगलच तापत आहे. कल्याणीनगर भागातील पोर्श कार अपघात प्रकरण असो की मग आता नुकतच समोर आलेलं ड्रग्ज प्रकरण यामुळे विरोधी पक्षांकडून महायुती सरकारवर जोरदार टीका होत आहे.
केवळ एवढच नाहीतर पालकमंत्र्यांना जाब विचारत, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'त्यांचंही राज्य होतं त्यांच्या राज्यात पोलीस विभागाचे कसे धिंडवड निघाले आणि 100-100 कोटी रुपयांची वसूली कशी झाली, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आमची पॉलिसी देशभरात झिरो टॉलरन्सची आहे. आज केंद्र सरकारची मदत मिळते आहे, सगळं राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहे. म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे.'
याचबरोबर 'त्यामुळे ड्रग्जच्या संदर्भात जी काही परिस्थिती आहे. त्यावर राज्यसरकार प्रभावीपणे काम करत आहे. अजून बरेच काळ ही कारवाई करत रहावी लागेल. आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. जो कोणी यामध्ये सापडेल, पोलीस असेल तर त्यावरही कारवाई होईल. हॉटेलचालक असेल त्याचावरही कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चालली आहे आणि तशीच सुरू राहणार आहे.' असंही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केलं.
याशिवाय 'मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि जर राजकारण करायचंच असेल तर मग त्यांच्या अडीच वर्षांत काय घडलं, ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. या ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या काळात कायकाय होतहोतं, हे देखील मला सांगावं लागेल. पण माझ्यासाठी हा प्रश्न कुठल्याही राजकारणापलिकडचा आहे.
आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे, त्याचं स्वागत झालं पाहीजे.' अशा शब्दांत फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे ड्रग्ज ( Pune Drugs Case ) प्रकरणावरून राजकारण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला. 'पालकमंत्री जबाब दो' अशा घोषणा देत अजित पवार यांना ड्रग्ज प्रकरणावरून जाब विचारण्यात आला.
ड्रग्ज विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनातीत बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. 'चौका चौकात गुन्हेगारी गृहमंत्री फरारी,' 'शंभूराज देसाई युवा पिढीचे कसाई', असे बॅनर आंदोलनात पाहायला मिळाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.