Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांच्या शिलेदारांचा अजितदादांवर निशाणा; ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्र्यांना विचारला जाब

Ncp Sharad Pawar Agitation Against Ajit Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांविरोधात आंदोलनात चकार शब्द काढण्यात येत नाही. पण, अजितदादांना विरोधात बॅनरबाजी करण्यात आली.
Sharad Pawar Agitation Against Ajit Pawar
Sharad Pawar Agitation Against Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे ड्रग्ज ( Pune Drugs Case ) प्रकरणावरून राजकारण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला. 'पालकमंत्री जबाब दो' अशा घोषणा देत अजित पवार यांना ड्रग्ज प्रकरणावरून जाब विचारण्यात आला.

ड्रग्ज विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनातीत बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. 'चौका चौकात गुन्हेगारी गृहमंत्री फरारी,' 'शंभूराज देसाई युवा पिढीचे कसाई', असे बॅनर आंदोलनात पाहायला मिळाले.

सहसा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांविरोधात ( Ajit Pawar ) आंदोलनात चकार शब्द काढण्यात येत नाही. पण, 'पालकमंत्री उत्तर द्या', असं म्हणत अजितदादांन विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. त्यासह 'मोदींसाठी मुरलीधर, पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर' असे बॅनर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात झळकवण्यात आले.

Sharad Pawar Agitation Against Ajit Pawar
Pune Bar Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरण उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक बोबडे निलंबित !

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "पुणे शहरात अंमली पदार्थांचं सुळसुळाट झाला आहे. कधीकाळी विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारे पुणे आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून देशात ओळखले जात आहे. छोट्या मोठ्या हॉटेल्स, बारमध्ये खुलेआम अंमली पदार्थ मिळतात. मात्र, केवळ गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे."

"कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. भर दिवसा हातात कोयता घेऊन हिंडणारे गुंड अनेक ठिकाणी दिसत आहेत. कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही. ड्रग्ज माफियांना, गुन्हेगारांना, अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे अभय आहे ही बाब सर्वश्रृत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी मात्र केवळ लोकसभा निवडणुकीच्या चिंतनात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि विधानसभेच्या जागा वाटपात व्यस्त आहेत," अशी टीका जगताप यांनी केली.

Sharad Pawar Agitation Against Ajit Pawar
Medha Kulkarni on Pune Crime : मेधा कुलकर्णीं म्हणतात, 'पुण्याची संस्कृती बिघडू न देण्यासाठी पोलिसांनी..'

यावेळी 'पालकमंत्री उत्तर द्या,' 'गृहमंत्री उत्तर द्या,' '50 खोके एकदम ओके,' '50 खोके कोयता गँग ओके,' '50 खोके ड्रग्ज माफिया ओके,' 'गृहमंत्री राजीनामा द्या,' 'उत्पादन शुल्क मंत्री राजीनामा द्या,' मोदींसाठी मुरलीधर पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर" अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमला होता.

सरकारकडून येत्या काही दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास शहरात एकाचवेळी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com