Pune Bar Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरण उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक बोबडे निलंबित !

State Excise Department : एफ सी रोडवरील 'एल 3' या हॉटेल बारमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीचा एका व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. मध्यरात्रीच्या वेळेस ही पार्टी सुरु असल्याचे समोर आले होते.
Pune Bar Drugs Case
Pune Bar Drugs CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील 'एल 3'बारमध्ये झालेल्या ड्रग्ज प्रकरणात आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या भागात ही पार्टी झाली तेथील उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक व्ही. बी. बोबडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलिस निरीक्षक, यांच्यासह दोन बीट मार्शल यांना निलंबित केलेले आहे.

एफ सी रोडवरील 'एल 3' या हॉटेल बारमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीचा एका व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. मध्यरात्रीच्या वेळेस ही पार्टी सुरु असल्याचे समोर आले होते. पार्टीमध्ये आलेले काही युवक, युवती ड्रग्जचे सेवन करत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांना तातडीने घटनास्थळी भेट देत पब मालक, पार्टनर यांच्यासह मॅनेजर, कर्मचारी अशा आठ जणांना ताब्यात घेतले होते.

Pune Bar Drugs Case
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर पब्जचा असा करणार बंदोबस्त

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या व्हिडीओची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते.

तसेच या प्रश्नावर विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी केली होती. पतित पावन संघटनेच्या वतीन या पबवर दगडफेक देखील करण्यात आली होती.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली देखील येथे आंदोलन झाले. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील पोलिसांनी आता अॅक्शन मोडवर येऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग्ज (Drugs) पार्टीचे प्रकरण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील भोवलं आहे. उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक व्ही बी बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

कर्तव्यात कसून केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बोबडे यांच्या कार्यक्षेत्रात हा बार होता, पार्टी सुरू असताना ते त्यांच्या परिक्षेत्रात उपस्थित नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

Pune Bar Drugs Case
Video Pune Drugs Case : मोठा दणका! ड्रग्ज व्हिडिओ प्रकरणी पोलिस निरीक्षकासह चार जण निलंबित

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी पोलिस निरीक्षक बोबडे यांना फोन केला होता. त्यावेळी ते मुख्यालयात उपस्थितच नसल्याचे समोर आले. यापूर्वी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात उपअधीक्षकांनी अवैध धंदे उघडकीस आणल्यावर संबधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते.

मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष करत बोबडे यांनी संबधितांवर गुन्हा न नोंदविता त्यांना सोडून दिले. यावरून त्यांची कामगिरी संशयास्पद आढळल्याने त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com