Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis: फडणवीसांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी टाकली गुगली; म्हणाले, 'दोन भावांनी एकत्र यावं आणि...'

Devendra Fadnavis On Raj And Uddhav Thackeray Unity : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सरकारनं हिंदीसक्तीचे दोन्ही निर्णय रद्द करत ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चा काढण्यावर पाणी फेरलं. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे बंधूंवर गुगली टाकली.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुती सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयावरुन राजकारण तापलं होतं.या निर्णयाविरोधात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी सरकारविरोधात रान पेटवत थेट एकत्रित मोर्चाची हाक दिली होती. पण अखेर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सरकारनं हिंदीसक्तीचे दोन्ही निर्णय रद्द करत ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चा काढण्यावर पाणी फेरलं. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे बंधूंवर गुगली टाकली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.30) भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल करण्यावेळी उपस्थित होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले,दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, असा काही जीआर आम्ही काढला नाही, त्यांनी एकत्र यावं किक्रेट खेळावं, टेनिस खेळावं, हॉकी खेळावी, स्वीमिंग करावं, जेवण करावं. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच दोन ठाकरे बंधू (Raj And Uddhav Thackeray Unity) एकत्र येत असतील मला अतिशय आनंद आहे. पण आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचं हित पाहणार नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहणार आहोत. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊ असं स्पष्ट मत व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेण्यामागं ठाकरे बंधूंचा दबाव असल्याचंही फेटाळलं.

फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या नेत्यानं हिंदी सक्तीची करा अशी शिफारस केल्याचंही यावेळी दाखवलं. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला. त्यामुळे हिंदीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळातच झाला होता. हे दुटप्पी लोक आहेत. यांचं सत्तेतले रुप आणि विरोधातलं रुप वेगळं आहे,असा टोलाही त्यांनी केली.

सीएम देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेत असलेल्या पत्रकार परिषदेची संयमी सुरुवात केली. विरोधकानी पाठवलेल्या पत्रात 22 मुद्दे आहेत. यापैकी बरेच मुद्दे हे जुनेच आहेत. केवळ मोठे पत्र दिसण्यासाठी फॉन्टची साईज वाढवण्यात आली आहे. या पत्रात मराठी व्याकरणाच्या एकूण 24 चुका असल्याची खोचक टिप्पणी महाविकास आघाडीवर केली होती.

तर दुसरीकडे भास्कर जाधव सध्या गायब असून त्यांची या पत्रावर सहीच दिसत नाही,असा चिमटाही काढला. या पत्रावर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाच आमदारांची तर काँग्रेसच्या तीन तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असल्याचे सांगत माविआच्या 5-3-2 वर देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT