Mumbai, 01 August : देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत. फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना काही करू शकत नाहीत. हेच फडणवीस मराठाविरोधी भूमिका घेतात, तेच म्हणतात आमचा DNA ओबीसींचा आहे.
मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे. त्याला भेट देणं, त्यात फूट पाडणे, पूर्वीदेखील आंदोलनात फूट पडली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shivsena UBT) निवडणूक चिन्हात बदल करून ते निवडणूक आयोगाला सादर केले आहे. शिवसेनेची मागणी मान्य करेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे. याशिवाय, आमच्या चिन्हाशी साधर्म्य असलेले दुसरे चिन्ह देऊ नये, अशी विनंतीही शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
अंबादास दानवे म्हणाले, सिल्लोड येथील लाडकी बहिण मेळाव्यात शासकीय यंत्रणा काम करत आहे. अनेक लोकांना दमबाजी केली जात आहे. माता भगिनीला जबरदस्तीने मेळाव्याला आणणं चुकीचं आहे. ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सांगितलं जातं की, तुम्ही मेळाव्याला आले नाही तर तुमचे फॉर्म मंजूर होणार नाहीत.
सरकारने लाडकी बहिण योजना आणली मात्र खरंच बहीण सुरक्षित आहे का? उरण येथील घटना घडली. मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण रोज वाढत आहे. माता भागिनींवर अन्याय अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिक फसव्या योजनेला बळी पडणार नाहीत, असा विश्वासही दानवे यांनी बोलून दाखवला.
ते म्हणाले, ज्या अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले होते, त्यांच्याकडे लाडकी बहिण योजना मेळावा घेतला जात आहे. सरकार त्यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी देत आहे. आम्ही काय खोटं बोललो, ते सांगा मात्र तुमचा खोटारडेपणा आम्ही उघड करू. आम्ही महिलांना सावध करत आहोत, त्यामुळे महायुतीचे लोक निवडणुकीत पराभूत होतील.
मनसेने फार काही केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकारी सत्य बोलले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मिटकरी यांची बाजू घेत की नाहीत, हेच कळत नाही, असेही अंबादास दानवे यांनी सांगितले.
अंबदास दानवे म्हणाले, मला वाटतं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सिलोडला पकिस्तान म्हटले होते, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाकिस्तानमध्ये येत आहेत का? भाजपला एकनाथ शिंदे जुमानत नाहीत, असा त्याचा अर्थ होतो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.