Ramtek Congress : पक्षविरोधी काम करणं भोवलं; रामटेकमधील काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत कुही शहराचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सहा पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 01 August : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करणं, हे रामटेक लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या चांंगलंच अंगलट आलं आहे.

काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत कुही शहराचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सहा पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यामुळे पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याच्या विरोधात काँग्रेसने कडक भूमिका घेतली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कुही शहर काँग्रेस (Congress) समितीचे अध्यक्ष विलास राघोर्ते, हर्षा इंदूरकर, उपाध्यक्ष अमित ठाकरे, नगरसेवक रुपेश मेश्राम, मयूर तळेकर आणि निशा घुमरे या पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसने बंडखोरांच्या विरोधात कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत कुही शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष विलास राघोर्ते यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केले हेाते.

Congress
Rahul Shewale Defamation Case: राहुल शेवाळेंची मानहानी करणं उद्धव ठाकरे, राऊतांना भोवलं; 2 हजारांचा दंड

रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे यांनी, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी निवडणूक लढवली होती. त्यात निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार वर्बे यांनी विजय मिळविला आहे.

मात्र, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणं कुही शहरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरेाधात चांगलंच अंगलट आलं आहे.

Congress
Rajratna Ambedkar : मनोज जरांगेंसाठी आंबेडकर मैदानात, मराठा आरक्षणाचे केले समर्थन

कुही शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका या सहा जणांच्या विरोधात ठेवण्यात आला होता. त्याबाबतचा अहवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू मुळक यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी या सहा पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची ही कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com