Sushma Andhare Vs Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare : दसरा मेळाव्यातही अंधारेंच्या निशाण्यावर फडणवीसच; केला 'हा' गंभीर आरोप

Sachin Waghmare

Mumbai News : शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मशाल पेटवण्याची तयारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे तोफेच्या तोंडी कोण कोण राहणार याची उत्कंठा लागली असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस राज्यभरात द्वेषांचे राजकरण पसरवत असल्याची घणाघाती हल्लाबोल केला.

शिवतीर्थावरील ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याप्रसंगी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महायुती सरकारच्या कारभारावर तोफ डागताना राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली. 15 मिनिटांच्या ओघवत्या भाषणात त्यांनी सडकून टीका करीत हा मेळावा आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. (Sushma Andhare news)

राज्यातील महायुतीचे सरकार सध्या शेतीमालाला भाव देत नाही. कापसाचं काय झालं? यावर कोणी बोलत नाही. केवळ या सरकारकडून जातीत भांडणे लावली जात असल्याचा आरोप यावेळी बोलताना अंधारे यांनी केला.

लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, 'आपण कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का? आपल्याला नात्यांची किंमत कळत नाही यांना बहिणीचे नाते कळत नाही. बाईपणावर हल्ले करता, हे संस्कार बाळासाहेबांचे असू शकत नाही ना ते आनंद दिघेंचे आहेत. तुमचे हे संस्कार रेशीमबागेतील आरएसएसचे असू शकतात. न्याय तुम्ही अत्याचार झालेल्या महिलेला देऊ शकत नाही.'

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरचा बंगला विकून दिले नाहीत. ना मुख्यमंत्र्यांनी आपली जमीन विकून पैसे दिले नाहीत. आमचेच पैसे आहेत, क्रेडिट घेऊ नका. राज्यातील जनतेच्या टॅक्समधून पैसे दिले आहेत. त्यामुळं तुम्ही त्याचे क्रेडीट घेऊ नका, असा घाणाघाती आरोप अंधारे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT