Samarjeet Ghatge News : कागल, कोल्हापूरचे नाव बदनाम करण्याचे काम पालकमंत्री मुश्रीफांनी केले; घाटगेंची टीका

Political News : कागल विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा त्यांनी अपमान केला. त्यांनी कागलमधील सर्व मतदारांची माफी मागावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी केले.
Hasan Mushrif Samarjeet Ghatge
Hasan Mushrif Samarjeet Ghatgesarkarnama
Published on
Updated on

KolhaPur News : खालच्या पातळीची भाषा वापरून हसन मुश्रीफ हे राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करत आहेत. गडहिंग्लजच्या इतिहासामधील सगळ्यात खालच्या पातळीचे भाषण मुश्रीफ यांनी केले. कागल विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा त्यांनी अपमान केला. त्यांनी कागलमधील सर्व मतदारांची माफी मागावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी केले.

मुश्रीफ यांनी पुरोगामीचा पडदा लावून काम केले. त्यांच्याकडे कधीच पुरोगामी विचार नव्हते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आशीर्वादामुळेच त्यांचे सर्व काही होते. पुरोगामी चळवळीचे लोक साथ देत होते ते आता सोडत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले आहे. निष्ठा विकून गेल्यामुळे लोकसात सोडत आहेत. त्यामुळे त्यांना ही स्टंटबाजी करावी लागत आहे. जमिनी संदर्भात काय चुकीचा असेल तर कारवाई करा. मात्र त्यांची पार्टी आता चार ठेकेदारांची झाली आहे, अशी टीका समरजित घाटगे (Samarjeet Ghatge) यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली. हे कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनाच विचारा, असेही यावेळी घाटगे म्हणाले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी दलालीचा आरोप केल्यानंतर समरजीत घाटगे म्हणाले, ते कागलचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्याकडून अपशब्द वापरले जातात. त्यामुळे कागल आणि कोल्हापूरचे नाव बदनाम करण्याचे काम पालकमंत्री हसन मुश्रीफ करतात. तुम्ही विकास केला म्हणता मग असे वक्तव्य करण्याची आवश्यकता काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Hasan Mushrif Samarjeet Ghatge
Amol Mitkari : अमोल मिटकरींनी केली रावणाची आरती; म्हणाले, “पुतळ्याचं दहन करणारे रामासारखे...”

निष्ठा विकून आल्यामुळे त्यांना रात्रीची झोप लागत नाही. झोप आली नसल्यामुळे असे चुकीचे वारंवार शब्द बोलतात. ही निवडणूक हसन मुश्रीफविरुद्ध कागलची सर्वसामान्य जनता अशी आहे, हे त्यांना कळाले आहे. साडेतीन लाख मतदारविरुद्ध मुश्रीफ अशी निवडणूक होत असल्यानेच त्यांचे चुकीचे शब्द समोरच्या बाजूने चुकीचे शब्द यावे यासाठीच त्यांचे वक्तव्य केले जात आहे. कागलच नाव बदनाम करण्याचा ठेका त्यांनी घेतला असल्याचा आरोप घाटगे यांनी केला.

मी केलेले आरोप हे बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे तुम्हीच सिद्ध केले आहेत. केलेल्या आरोपानंतर तुम्ही तिकडेच पळून गेला. भांडवलदार साहेबांनी चाळीस कोटी रुपये खाल्ले त्याचा हिशोब त्यांनी द्यायला हवा होता, असा आरोपही यावेळी घाटगे यांनी केला.

Hasan Mushrif Samarjeet Ghatge
Pankaja Munde : भाषणाला सुरूवात करताच लक्ष्मण हाके दिसले अन् पंकजा मुंडे म्हणाल्या, "हे गोंडस लेकरू..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com