Vivek Phansalkar and Rajnish Seth Sarkarnama
मुंबई

Vivek Phansalkar: पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त; अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकरांकडे सोपवला

Police Commissioner : राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे रविवारी सेवानिवृत्त झाले.

Ganesh Thombare

Mumbai News: राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे रविवारी सेवानिवृत्त झाले आहेत. आता राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हा फणसळकर यांच्याकडे असणार आहे.

रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर पोलिस महासंचालकपदासाठी रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्या निवडीबाबत केंद्राकडूनही ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा होती. पण त्या या पदासाठी इच्छूक नसल्याचं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज निवृत्त झालेले रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही काम पाहिले होते. 2021 मध्ये राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

कोण आहेत विवेक फणसळकर ?

राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला असून ते 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी देखील आहे. फणसळकर हे अकोला येथे पोलिस उपअधीक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांची अकोल्यातील कारकीर्द चांगलीच गाजली होती.

अकोला आणि वऱ्हाडातील जिल्ह्यांमध्ये सातत्याने जातीय दंगली व्हायच्या. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फणसाळकर यांनी पुढाकार घेतला होता. तसेच फणसळकर यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी आयपीएस अधिकारी अंबालाल वर्मा यांच्या कार्यकाळात अकोला येथे पूर्ण झाला होता.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT