Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : मुंबईतील 'म' फॅक्टर उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडणार का?

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेनेतील बंड आणि पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे देशातील निवडणुकीला समोरे गेले. मुंबईवर राजकीय वर्चस्वासाठी भाजप आणि शिवसेनेत घमासान झाल्याचे दिसते. मात्र या लढाईत उद्धव ठाकरेंचा भाजपवर 'म' फॅक्टर घेऊन भारी पडल्याचे दिसते. मराठी माणूस आणि मुस्लिम हे आहेत, ते दोन 'म' फॅक्टर!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होत आहे. यात मुंबईत सहा मतदारसंघ असून, येथील मतदानांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या बंडानंतर शिवसेना फुटली. शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट पडले. देशात लोकसभा निवडणुकांचा जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूकांचे नियोजित केल्या. यात पाचव्या टप्प्यात मुंबई आणि मुंबईच्या लगत असलेल्या इतर मतदारसंघात आज मतदान होत आहे. शिवसेना फुटीनंतर ठाकरेंची अस्तित्वाची लढाई आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना फुटीपूर्वी राज्यात सरकार स्थापना करताना महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. शिवेसना त्यात महत्त्वाचा पक्ष होता. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर शिवसेनेत बंडाळी झाली. शिवेसना फुटली. आता ठाकरे आणि शिंदे गट निवडणुकीला समोरे जात आहे. महाविकास आघाडीत महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा जागा वाटपात दबदबा राहिला. शिवसेना राज्यात सर्वाधिक जागांवर लढा देत आहे. यातून उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील ताकद लक्षात येते. Shiv Sena Uddhav Thackeray Marathi man and Muslim factor discussed in Mumbai

महाराष्ट्रात आता पाचव्या टप्प्यात मतदान सुरू आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुंबईत मतदान होत आहे. त्यामुळे येथे नेमकी काय परिस्थिती राहिल, याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी मुंबईत या निवडणुकीत राबवलेल्या दोन 'म' फॅक्टरची चर्चा सध्या सुरू आहे. हे दोन 'म' फॅक्टर म्हणजे, मराठी माणूस आणि मुस्लिम होय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हे दोन 'म' फॅक्टर एकत्रित लढा देत होते. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात लढले होते. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे.

शिवसेनेने कट्टर हिंदुत्वाची बदलेली व्याख्या आणि राडेबाज संस्कृतीची बदलेली प्रतिमा आता वेगळी दिसते. उद्धव ठाकरेंनी यावर खूप मेहनत घेतल्याचे दिसते. कोविड काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेले सर्व समावेशक कामाची शर्थ केली होती. त्यामुळे शिवसेनेशी मुंबईत आज दोन 'म' फॅक्टर अधिक घट्ट जुळले गेले असून, त्या कामाची पावती निवडणुकीतून देतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT