Banner Against Eknath Shinde In Thane Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Banner : 'मोदी तर नकोच, ढोंगी पण नको' ; ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांना डिवचले...

सरकारनांमा ब्यूरो

पंकज रोडेकर -

Thane News : शहराला बॅनरबाजी काही नवीन नाही. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जात नाही, तोच 24 तासात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात 'मोदी नकोच आणि मोदींसोबत ढोंगी पण नको.' असे बॅनर लावून ठाकरेंच्या उपजिल्हाप्रमुखांनी अक्षरशः महायुतीवर हल्लाबोल करत चिमटा काढला आहे. या बॅनरवरुन आता शिंदे किंवा महायुती कशाप्रकारे उत्तर देते? हे पाहावे लागणार आहे. (Latest Marathi News)

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, महाविकास आघाडीने माझी ओळख काम, समर्पण आणि निष्ठा असे म्हटले होते. तसेच तो बॅनर मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान जवळ लावून डिवचण्याचे काम केले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यांचा निर्णय दिल्यानंतर महाविकास आघाडीने बॅनर लावत, आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली, असे नमूद करून भाजपवर निशाणा साधला होता. अशाप्रकारे बॅनरबाजी करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने सुरू केला आहे.

मध्यंतरी म्हणजे गेल्या वर्षी ठाण्यात सुरू झालेल्या बॅनर-बाजीला बॅनर लावूनच उत्तर दिले जात होते. मात्र अजून ही महाविकास आघाडीने लावलेल्या त्या दोन बॅनरला उत्तर दिले गेले नाही. त्यातच आता ठाकरेंचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदारसंघात 'मोदी नकोच" या मोठ्या अक्षरासह लहान अक्षरात आणि 'मोदींसोबतचे ढोंगी पण नको', असे काळ्या रंगाच्या बॅनरवर पांढऱ्या रंगात विरोध दर्शवणारे बॅनर लावले आहे. तसेच हाच बॅनर सोशल मीडियावर ही व्हायरल झाला आहे. त्यामुळे या बॅनरला आता महायुतीमधील मित्रपक्षांपैकी कोणी कशाप्रकारे उत्तर देते तेच पाहावे लागणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT