Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : राज्यात 2 लाख 76 कोटींची गुंतवणूक, 64 हजार रोजगार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी माहिती

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : राज्यात सरकार आणि हायड्रोजन उर्जा निर्मिती करणाऱ्या सात प्रकल्पांसाठी सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पांच्या माध्यामातून राज्यात तब्बल दोन लाख 76 हजार 300 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर यातून सुमारे 64 हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष लोकेश चंद्रा, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे आणि सात कंपन्यांचे संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

हायड्रोजन उर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी करार झाल्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे प्रकल्पांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, केंद्राच्या हरित हायड्रोजन मिशनच्या सूचनांनुसार राज्यात हरित हायड्रोजन धोरण-2023 घोषीत केले होते. राज्यात 2030 पर्यंत 500 केटीपीए (किलो टन्स पर अनम) इतके हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे. ते प्राप्तीसाठी सरकारतर्फे सवलती देऊ केलेल्या आहेत. यातून राज्यात हरित हायड्रोजन परिसंस्थांमध्ये देशात टॉप बनवणार आहे, अशी ग्वाहीही शिंदेंनी दिली.

महाराष्ट्र ठरले पहिले राज्य

पंतप्रधान मोदींनी 2030 पर्यंत डीकार्बनाईज करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार पुढाकार घेत हरित हायड्रोजनचे धोरण राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितले. हरित हायड्रोजन असे तंत्रज्ञान आहे की पर्यावरणाचा समतोल राखून उर्जा निर्मिती करता येते. याबाबत केलेल्या धोरणात आवश्यक ते बदल सूचवावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कंपन्यांचा समावेश

राज्यासोबत झालेल्या सामंजस्य करारात एनटीपीसी ग्रीन एनर्जी, अवादा ग्रीन हायड्रोजन, रिन्यू ई-फ्युअल्स, आयनॉक्स एअर प्रॉडक्टस्, एलएनटी ग्रीन टेक, जेएसडब्ल्यू ग्रीन हायड्रोजन, वेलस्पन गोदावरी जीएच 2 या कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांची क्षमता 910 केटीपीए होऊन दरवर्षी 511 कोटी किलो कार्बन उत्सर्जनात कपात होणार आहे. तसेच सुमारे चार हजार 732 केटीपीए हरित अमोनिया निर्मिती होणार असल्याचे उर्जा विभागाच्या प्रधान सचिव शुक्ला यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT