Goa News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यांनी हे खासदार फोडतानाच महाराष्ट्रात गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी करुन दाखवलं. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर 3.0 लवकरच पुढचं मिशन ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचं सूप वाजताच उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे तातडीनं गोव्यात दाखल झाल्याचं एका सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओ पोस्टमुळे समोर आलं आहे. त्यामुळे शिंदे हे सध्या राज्यासह देशपातळीवरील राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे गोवा दौऱ्यावर आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धामधूम उरकल्यानंतर शिंदेंनी थेट गोवा गाठलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंचा हा खासगी आणि गोपनीय गोवा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
एकनाथ शिंदेंनी गोव्यात दाखल झाल्यावर सोमवारी(ता.13) सकाळच्या सुमारास येथील प्रसिद्ध बाणावली समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे. यावेळी त्यांनी गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार फ्रान्सिस उर्फ पेले फर्नांडिस यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधल्याचं दिसून येत आहे. या भेटीवेळी दोघांमध्ये झालेल्या संवाद झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
यावेळी प्रसिद्ध मच्छीमार फ्रान्सिस उर्फ पेले हे मुंबई आणि महाराष्ट्रातून येणारे पर्यटक गोव्यातील पर्यटनाचा कणा असल्याचं शिंदेंना सांगत आहे. तसेच गोव्याच्या पर्यटनात महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांमुळे वाढ होत असल्याची भावनाही शिंदेंजवळ व्यक्त करताना या व्हिडीओतून समोर येत आहेत.
महाराष्ट्र, मुंबईतून गोव्यात पर्यटनाला जाण्याचे नागरिकांना आवाहन करण्याची विनंती देखील पेले शिंदेंशी बोलताना करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पेलेंना सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत आहेत.
पुढील वर्षी महाराष्ट्राशेजारील गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. राज्याच्या राजकारणातील सत्ताधारी महायुती सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपची सत्ता गोव्यात आहे. आता त्याच राज्याच्या राजकारणात शिंदे अॅक्टिव्ह झाले आहेत.
गोवा विधानसभा निवडणुका शिंदेंची शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचं त्याच पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी उघडपणे सांगत आहेत. गोवा विधानसभेच्या 2027 निवडणुका होत असून शिंदेंनी आपले लक्ष गोव्याकडे वळवले असून येथे शिवसेनेला उमेदवार उतरवणार आहे.
शिवसेना पक्ष राज्याबाहेर जाऊन निवडणूका लढवत पहिलं राजकीय यश मिळवण्यासाठी कंबर कसत आहे.त्यांची शिवसेना ही गोवा विधानसभेच्या 40 पैकी 30 जागा लढवणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं गोवा विधानसभा मिशन'साठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं रणनीती आखली असून माजी लोकसभा खासदार गजानन कीर्तीकर आणि मुंबईचे माजी नगरसेवक दिलीप नाईक व राजू पेडणेकर यांच्याकडे जबाबदारी दिल्याचेही वृत्त आहे. पेडणेकर यांच्याकडे उत्तर गोवा तर नाईक यांच्याकडे दक्षिण गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.