Jayant Patil: जयंत पाटलांना थोपवण्यासाठी थेट मंत्रालयातुन 'फिल्डिंग'? निकटवर्तीयावरील कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

Jayant Patil, Anandrao Malgunde, Sangli News: ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेमागे जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यासाठी मंत्रालयातून दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
 Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर झालेली अपात्रता कारवाई म्हणजे आमदार जयंत पाटील यांना त्रास देण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणला आहे. नगराध्यक्षांच्या वकिलांनी मांडलेली बाजू अजिबात विचारात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दबावातून अवघ्या तीन ओळीत आदेश काढून हा अन्यायकारक निकाल दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली आहे.

या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा देऊ आणि तो जिंकू, असा इशारा देत जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले की, निवडणूक झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत शहरात मोठी कामे झाली आहेत. मी दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झालो असून शहरात माझे स्वतःचे किंवा माझ्यामुळे अन्य कोणाचेही अनधिकृत अतिक्रमण नाही.

 Jayant Patil
Maharashtra Political Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

आपली भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्ष मलगुंडे पुढे म्हणाले की, माझी संबंधित वास्तू १९६० पासून अस्तित्वात आहे. इतकेच नव्हे तर २००१ मध्ये रीतसर पैसे भरून गुंठेवारीचे नियमितीकरणही करून घेतले आहे. अशा परिस्थितीत कोणताही अभ्यास न करता प्रशासनाने दिलेला हा निकाल पूर्णपणे अन्यायकारक आहे. अतिक्रमणाबाबत मला प्रशासनाकडून आधी एकही नोटीस आली नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत म्हटले की, आमचा संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयात पूर्ण ताकदीने बाजू मांडून आम्ही ही लढाई निश्चितपणे जिंकू. या प्रकरणात दोन्ही बाजू तपासून न्याय देणे अपेक्षित होते. शहरातील ११ हजार मालमत्तांच्या कब्जेपट्ट्या आहेत आणि त्यात लाल रेषा आहेत, मग या सर्वच जागांवर जिल्हाधिकारी अशीच कारवाई करणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 Jayant Patil
Maharashtra News Live Update : केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, ओम राजेनिंबाळकर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

आमदार जयंत पाटील यांना त्रास देण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणून पूर्णपणे राजकीय हेतूने हा निकाल लावला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पदावर असताना जर एखादे बेकायदेशीर काम केले असेल तर अपात्रतेची कारवाई ठीक आहे, मात्र केवळ राजकीय आकसापोटी नगराध्यक्षांना अडकवण्यासाठी मुद्दाम हा निकाल दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com