Dipesh Mhatre Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदेंचा युवा भिडू ठाकरेंची 'पेटती मशाल' हाती घेणार

Dipesh Mhatre from Kalyan Dombivli will join Shiv Sena Uddhav Thackeray party : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी विधानसभेसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

शर्मिला वाळुंज

Mumbai News : डोंबिवलीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करत लवकरच ते डोंबिवलीहून 'मातोश्री'कडे रवाना होणार आहेत.

म्हात्रे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने शिंदे गटाला जोरदार धक्का बसला असला, तरी येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुढे कडवे आव्हान म्हात्रे यांच्यामुळे उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली विधानसभा क्षेत्रात महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरीस सुरवात झाली आहे. शिवसेनेचे राज्य युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री यांचे सुपुत्र तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी दीपेश म्हात्रे यांची चांगलीच जवळीक राहिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

विधानसभा निवडणुकीत आमदारकीची निवडणूक लढण्यास दीपेश इच्छुक आहेत. 2014 साली देखील त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यंदा ते पुन्हा इच्छुक आहेत. राज्यात महायुती झाल्यास ही जागा भाजपकडे जाऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील (Shiv Sena) इच्छुकांना संधी मिळणार नाही. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे येथे संधीच मिळणार नसल्याचा विचार करत म्हात्रे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

प्रवेशाचे संकेत

डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी विकास कामाच्या मुद्द्यावर म्हात्रे यांनी कायम टीकेची झोड उठवली आहे. नुकताच मंत्री चव्हाण यांचा वाढदिवस साजरा झाला, त्यावेळी लागलेल्या बॅनरवरून देखील चव्हाण आणि म्हात्रे यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. यानंतरच डोंबिवलीत गणेशोत्सव, असो किंवा नवरात्री, असो दीपेश यांच्या बॅनरवरून पक्षप्रमुखांचे फोटो गायब झाले.

कशासाठी प्रवेश

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले होते. तेव्हाच दीपेश लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार याची चर्चा सुरू झाली होती. याविषयी दीपेश यांना विचारले असता दुपारी दोन वाजता मी माझी भूमिका स्पष्ट करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच पक्षावर कोणतीही नाराजी नाही. मात्र डोंबिवलीच्या विकासासाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सात माजी नगरसेवकांचा प्रवेश

युवा सेना सचिव तथा स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नाताई म्हात्रे तसेच कल्याण-डोंबिवलीमधील माजी नगरसेवक वसंत भगत, अरुण भोईर, माजी नगरसेविका संपत्ती शेलार, संगीता भोईर देखील ठाकरे घाटात प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT