Mumbai News, 05 Oct : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणापासून राज्यात अनेक 'हिट अँड रन'ची प्रकरणं समोर येत आहेत. अशातच आता काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हंडोरे यांनी काल शुक्रवारी रात्री एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या खासदारपुत्राने ज्या दुचाकीस्वाराला धडक दिली. त्याला उपचारासाठी घेऊन न जाता घटनास्थळावरून पळ काढला. अखेर या अपघात प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गणेश यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Congress) खासदार चंद्रकांत हंडोरेंचा मुलगा गणेश हे ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेले होते. परत येताना चेंबूर येथील आचार्य कॉलेजजवळ त्यांनी गोपाळ आरोटे नावाच्या दुचाकीस्वाराला धडक दिली आणि तिथून पळ काढला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गणेश हंडोरे यांना अटक केली. मात्र त्यांची शुगर वाढल्याने त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर जखमी गोपाळवर झेन रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणाचा पुढील तपास गोवंडी पोलिस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.