Mumbai News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातही मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी राजकारण चांगलंच तापलं होतं.एकमेकांना आव्हानं देताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या भाषणात काय नव्या घोषणा करतात, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.यातच उद्धव ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर आपलं भाषण सुरू केलेल्या शिंदेंनी (Eknath Shinde) एकापाठोपाठ एक असे टोकदार शाब्दिक हल्ले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर चढवले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी(ता.2 ऑक्टोबर)नेस्कोत आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.यावेळी एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना तुम्ही धीर सोडू नका,टोकाचे पाऊल टाकू नका.तुमचे भाऊ इकडे आहेत. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांची वेदना आहे.पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तुम्हाला मदत दिवाळी येण्यापूर्वी दिली जाईल हा तुमच्या एकनाथचा शब्द असल्याचं सांगितलं.
यावेळी त्यांनी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहे.शेतीवाहून गेली आहे.घरे पडली आहेत.त्यांचे दु:ख डोळ्याने मी स्वत:पाहिले आहे.कारण बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले की, 80 समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करायचे.हा मंत्र आपण सोडला नाही.जेथे संकट तेथे शिवसेना,जिथे संकट तेथे हा एकनाथ शिंदे धावून जातो, असंही शिंदे यांनी म्हटलं.
हा दसरा मेळावा मुंबई आणि ठाण्यापुरता मर्यादित करण्यामागचं कारणही यावेळी एकनाथ शिंदे समोर आणलं. ते म्हणाले,शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) नेहमी थाटामाटात साजरा होत असतो. पण यंदा बळीराजा संकटात असल्यानं आणि मराठवाड्यात आपत्ती आली आहे.पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी मीच शिवसैनिकांना सांगितले की, तुम्ही तेथेच थांबा असं त्यांनी नमूद केलं.
1) बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती आहे.पण हे कुठेही गेले तरी माझ्या हातात काही नाही म्हणतात,मग होतं तेव्हा तरी कुठं दिलं.द्यायलाही दानत लागते,ही लेना बँक नाही,देना बँक आहे. आम्ही कितीतरी योजना दिल्या असून दोन्ही हाताने दिले.कधी म्हटलं नाही, माझ्या हातात काही नाही.
2) कपड्यांची इस्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन जाणारा एकनाथ शिंदे नाही.वर्क फ्रॉम करणारा शिवसैनिक नाही.
3) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही.जर का आता जिंकलो नाही,तर मुंबई 25 वर्षे मागे जाईल.म्हणून जी कामं केली, ती लोकांपर्यंत पोचवा.सगळीकडे महायुतीचा भगवा फडकला पाहिजे.
4) मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम करतो, तुम्ही एकनाथ शिंदेप्रमाणे काम करायचं आहे.
5) बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले की ८० समाजकारण आणि २० टक्के राजकारण करायचे. हा मंत्र आपण सोडला नाही. जेथे संकट तेथे शिवसेना,जिथे संकट तेथे हा एकनाथ शिंदे धावून जातो असेही शिंदे यावेळी म्हणाले.
6) मराठवाड्यात,विदर्भात अतिवृष्टीचं मोठं संकट आलं.यात अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत.पण मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न ठरली असतील,त्यांची जबाबदारी शिवसेना घेईल.
7) 2026 हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून आगामी वर्षात बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल.
8) 'कोणीच पक्षप्रमुख आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत नसतो.पण तुम्ही गटप्रमुख नाही तर कटप्रमुख'आहात.
9) काहीजण आम्हाला मेळावा सुरतमध्ये करा असं म्हणाले.सुरत भारतामध्येच आहे.पण,तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये करायला हवा.असिफ मुनीरला त्या मेळाव्यात बोलवा.तुमच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये हेडलाईन होते.
10) मुंबई महापालिकेत 30 वर्षे जमवलेली माया कुठे गेली,लंडनला गेली का?
11) दुष्काळग्रस्तांना आम्ही मदत केली. त्या मदतीवरचे आमचे फोटो विरोधकांना दिसले. पण काम नाही. फोटोग्राफरला फक्त फोटो दिसतात.
12) मी मुख्यमंत्री झाल्यावर सर्व प्रकल्पांवरील बंदी हटवली. नवी मुंबईतील विमानतळ, मेट्रो 3 सुरु झाली. महाबिघाडी सरकार असतं, तर यापैकी एकही प्रकल्प झालं नसतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.