Jayant Patil-Gopichand Padlkar
Jayant Patil-Gopichand PadlkarSarkarnama

Gopichand Padalkar News : ...म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बिरोबा बनातून पुन्हा एकदा झोडून काढलं; पडळकरांचा मोठा खुलासा

Gopichand Padalkar Vs Jayant Patil : भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात संघर्ष पेटला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज देऊनही पडळकर यांनी जयंत पाटलांवरचा हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे पडळकर हे मुख्यमंत्री फडणवीसांचंही ऐकेनात की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Published on

Sangli News: भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात संघर्ष पेटला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज देऊनही पडळकर यांनी जयंत पाटलांवरचा हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील दसरा मेळाव्यानंतर पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे पडळकर हे मुख्यमंत्री फडणवीसांचंही ऐकेनात की काय, अशी चर्चा सुरू झाली असतानाच दुसरीकडे त्यांनी आरेवाडी जयंत पाटलांवर आपण का भडकलो याचं स्पष्टीकरण दिले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) गुरुवारी(ता.2) सांगलीतून पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले,तुम्ही मला अरे म्हटलं, तर मी कारे म्हणणार...मला एक कानाखाली माराल, तर मी दोन कानाखाली मारेल. तुम्ही टीका केली, तर मी टीका करणारच, मग मला संस्कृतीचं काही देणंघेणं नाही असंही पडळकरांनी सांगितलं.

पडळकर म्हणाले, मी जतमध्ये 18 तारखेला जे काही बोललो, त्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला त्यांनी मला सक्त सूचना दिल्या,यांनी मला परत असं परत बोलायचे नाही अशा सूचनाही केल्या होत्या. याबाबत आपण मीडियासमोर स्पष्टीकरणही दिले होते. तसेच आपल्याला चंद्रकांत पाटील यांचाही फोन आला,मी त्यांनाही यापुढे असं बोलणार नसल्याचं सांगितलं होतं.

पण 22 तारखेला सांगलीतील पुष्कराज चौकात झालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात माझ्यावर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली,इथपर्यंत ठीक होतं,मात्र,त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली.म्हणून मी त्यांना बिरोबा बनातून पुन्हा एकदा झोडून काढलं,असा कडक पलटवार पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केला आहे.

Jayant Patil-Gopichand Padlkar
Manoj Jarange Patil News : विखे पाटलांचा फोन, पण जरांगेंचा प्लॅन ठरला; नारायणगडावरून केली मोठी घोषणा...

एखाद्या व्यक्तीला विरोध करू शकता पण संपूर्ण ब्राह्मण समाजाला तुम्ही कशा शिव्या देऊ शकता, ही तुमची कुठली संस्कृती आणि संस्कार आहेत. ब्राह्मण समाजाला शिव्या देणे हे कदापि खपवून घेणार नाही. गोपीचंद पडळकर बोलले की, त्यांची जीभ घसरली असे म्हणतात. मग मला शिव्या घातल्या त्याच्यावर का महाराष्ट्रात चर्चा झाली नाही असा आरोपही पडळकरांनी केला.

भाजप आमदार पडळकरांनी यावेळी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी माझे कान पकडू देत तो त्यांचा अधिकार आहे असंही म्हटलं. पण राष्ट्रवादीनं मला आरे, कारे केला तर ते मी कदापि खपवून घेणार नाही, त्याचबरोबर जयंत पाटलांना Jayant Patilभाजपमध्ये घेऊ नका, अशी मागणीही गोपीचंद पडळकर यांनी भाषणातून चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

Jayant Patil-Gopichand Padlkar
Pankaja Munde : भगवान गडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे संतापल्या; ‘कुणाची सुपारी घेऊन आलात?’

पुढचा नेता कोण होणार हे भाजपला माहीत नसतं. नरेंद्र मोदी आले तेव्हा माहित नव्हतं की हेच पंतप्रधान होणार आहेच. त्यांच्यानंतर पंतप्रधान कोण होईल हे देखील पक्षाला माहीत नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यावर खालच्या पातळीवर बोलाल तर याद राखा, गोपीचंद पडळकर त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देईल,असा इशाराही पडळकरांनी यावेळी विरोधकांना दिला

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या मतदारसंघात वोटचोरी झाली, तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा,असं आवाहन दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, हा माझा प्रॉब्लेम असल्याचा खोचक टोला पडळकरांना लगावला होता.

Jayant Patil-Gopichand Padlkar
Manoj Jarange Patil : आरक्षण मिळालं, आता पुढे काय? जरांगेंचा दसरा मेळाव्यातून मराठा समाजाला संदेश

यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे मंगळवारी (ता.30) सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली होती. जयंत पाटील यांनी सांगावं, त्यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?’अशी खोचक टिप्पणी केली होती. यामुळे पुन्हा एकदा पडळकर आणि पाटील वाद पेटला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com