Eknath Shinde: दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी ठरवून राऊतांचा हिशोब चुकता केला; पाकिस्तान,असीम मुनीरसह सगळंच ऐकवलं
Mumbai News : आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक होत असल्यानं यंदाच्या वर्षी दोन्ही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली होती.उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थवर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नेस्कोत दसरा मेळावा पार पडला.या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात विरोधकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) अक्षरश:तुटुन पडले.
दसरा मेळाव्याआधी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून आलं होतं. याचदरम्यान,खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली होती. शिंदेंच्या पक्षाने आपला दसरा मेळावा अहमदाबाद,सुरत किंवा बडोद्याला घ्यावा,तसेच त्यांच्या मेळाव्याला प्रमुख प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहांना बोलवावे, अशी खोचक टिप्पणीही राऊतांनी केली होती.त्याच टीकेला शिंदेंनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं.
शिंदे म्हणाले, काहीजण आम्हाला मेळावा सुरतमध्ये करा असं म्हणाले.पण सुरत हे भारतामध्येच आहे. मात्र,तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये करायला हवा होता.त्या मेळाव्यात असिम मुनीरला बोलवा. मग तुमच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये हेडलाईन झाली असती. देशद्रोहाची भाषा बोलणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा हक्क नाही. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे, असा हल्लाबोल शिंदेंनी यावेळी केला.
कोणता पक्षप्रमुख पक्षातील नेत्यांनाच संपवण्यासाठी प्रयत्न करतो.पण रामदास कदम यांनी यापूर्वीच अनेक नेत्यांची नावं घेतली आहेत. त्यामुळे ते'तुम्ही गटप्रमुख नाही तर कटप्रमुख'आहेत, अशी जिव्हारी लागणारी टीकाही शिंदेंनी यावेळी केली.
मी मुख्यमंत्री झाल्यावर सर्व प्रकल्पांवरील बंदी हटवली.नवी मुंबईतील विमानतळ सुरु होत आहे.मेट्रो 3 सुरु झाली. महाबिघाडी सरकार असतं, तर यापैकी एकही प्रकल्प झालं नसतं, असा दावा शिंदे यांनी केला. तसेच केंद्रातील मोदी सरकारनं कोरोना काळात महाराष्ट्राला 46000 कोटी दिले होते,असंही शिंदेंनी(Eknath Shinde) आपल्या भाषणात म्हटलं.
मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे. महापुराने बळीराजा कोलमडला आहे. अटी आणि शर्थी बाजूला ठेवून बळीराजाला मदतीचा आधार दिला पाहीजे. संकट मोठे आहे. अनेक वर्षात एवढा पाऊस आम्ही पाहिला नाही असे शेतकरी म्हणत आहेत. सगळं काही उद्धवस्त झाले आहे. म्हणून या मेळाव्याला आपण आजूबाजूच्या लोकांना बोलवले. दसरा सण मोठा, नाहीआनंदाला तोटा. परंतू यावेळी पुराचे संकट आहे. आपण त्यासाठी हा निर्णय बळीराजासाठी घेतला आज बाळासाहेब असते तर आपली पाठ थोपटली असती असंही एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात सांगितलं.
एकनाथ शिंदेंनी यावेळी तुम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यावर टीका करतात, असं ठणकावलं. अयोध्येत राम मंदिर उभारणं, जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. तुम्ही त्यांच्यावरच टीका करतात असंही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.