Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या पक्षात चाललंय तरी काय? 50 पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत...

Shivsena Crisis : कोल्हापुरातील शिंदे गटाच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाकडे लक्ष

संदीप पंडित

Thane Political News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सेनेतील आमदार आणि खासदार गेल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे यांची झाली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापूर येथे शिंदे गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. त्यापूर्वीच वसईमध्ये मात्र या पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे. नालासोपारा आणि विरारमधील जवळपास 50 पदाधिकारी जिल्हाप्रमुखाच्या मनमानीला कंटाळून राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची आहे. हा प्रकार म्हणजे शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

वसई तालुक्यात शिवसेनेच्या फुटीनंतर काही नेते हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर गेले, परंतु शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहिले होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्यांना वेगवेगळी पदे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. असे असले तरी त्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरोधात आता आवाज उठू लागला आहे.

विरार आणि नालासोपारा (Nalasopara) मधील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, पक्ष वाढ यांसारख्या गोष्टींमध्ये इतरांना डावलून जिल्हाप्रमुखांचा मनमानीपणा सुरू असल्याच्या विरोधात पक्षातील उपजिल्हाप्रमुख ते शाखा प्रमुख, पदाधिकाऱ्यापर्यंत हे नाराजीचे लोन पसरले आहे. हे सर्वजण येत्या काही दिवसांत राजीनामे देण्याच्या मनस्थिती असल्याचे समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शुक्रवारी कोल्हापूर (Kolhapur) येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनाला यातील बरेच पदाधिकारी गेले आहेत. त्या ठिकाणी हा प्रश्न ते मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडणार आहेत. यातून मार्ग न निघाल्यास वेगळा विचार करण्याच्या तयारीत हे पदाधिकारी आहेत. त्यांच्या नाराजीवर तातडीने उपाय निघाला नाही तर याचा फटका वसईसह पालघर जिल्ह्यात शिंदे गटाला बसण्याची शक्यता याठिकाणी वर्तविण्यात येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT