NCP MLA Disqualification News : नार्वेकरांच्या निकालानंतर शरद पवार गट उचलणार मोठे पाऊल; जयंत पाटलांचे संकेत

Jayant Patil NCP MLA Disqualification Result : निकाल देताना नार्वेकरांनी कोणालाही अपात्र न करणे हा मध्यम मार्ग निवडला
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

NCP MLA Disqualification : विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असल्याचे जाहीर केले. या निकालाविरोधात शरद पवार गटासह विरोधकांनी सडकून टीका केली. दरम्यान, खरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना बगल दिल्याचाही आरोप केला.

नार्वेकरांनी फक्त बहुमत लक्षात घेतले. बहुमतावर निर्णय देणे हा नवा प्रकार आता दिसतो. निकालाविरोधात न्यायालयात जाणार आहे. तेथे हा निर्णय मान्य होणार नाही, असा दावाही पाटलांनी केला. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2018 मध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर 22 मध्ये कोविड होता. त्यानंतर शरद पवार अध्यक्ष झाले. काही जिल्ह्यात निवडणूक झाल्या. आमच्या घटनेनुसार नवीन पदाधीकारी निवडले जात नाहीत तोपर्यंत जुने पद सोडत नाहीत. त्यामुळे घटनेच्या पलिकडे जाऊन निर्णय होऊ शकत नाही, याकडे पाटलांनी लक्ष वेधले.

Jayant Patil
NCP MLA Disqualification : '10 व्या सूचीचा गैरवापर करून आमदारांना धमकावू नका'; नार्वेकरांनी शरद पवार गटाला फटकारले!

नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दोन्ही बाजूच्या कुणालाही अपात्र केले नाही. यावर पाटील म्हणाले, निकाल देताना नार्वेकरांनी कोणालाही अपात्र न करणे हा मध्यम मार्ग निवडलेला दिसतो. तसे झाले असते तर अपात्र झालेले कोर्टात गेले असते. 10 परिशिष्ठानुसार अपात्र झाल्यानंतर संबंधितांना निवडणुकीला उभे राहता येते. तसेच न्यायालयातही अर्जंसीनुसार निकाल दिला जाईल. हे टाळण्यासाठी कुणालाच अपात्र ठरवले गेले नाही, असे पाटील म्हणाले.

Jayant Patil
NCP MLA Disqualification : विरोधात निकाल गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी नार्वेकरांना दिली थेट 'धृतराष्ट्रा'ची उपमा

आपल्या घटनेत १० व्या परिशिष्ठाला महत्व असून या निकालात त्याचा विचारच केला नसल्याचेही पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालय 10 परिशिष्ठातील तरतुदी तपासेल. त्याबाबत निवडणूक आयोगाकडून (ECI) दिले गेलेले निर्णय आणि विधानसभेत 10 शेड्यूलबाबत केलेले निर्णय याबाबत कोर्ट फार महत्वाचे निर्णय घेतील. त्यांनी घटना केल्यानंतर आम्ही 10 शेड्युलनुसार याचिका दाखल केली. त्यामुळे या परिशिष्ठेचा वापर कुणालाही धमकावण्यासाठी होत नाही, असे पाटील म्हणाले.

Jayant Patil
NCP MLA Disqualification Result : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवण्याचं कारण काय? राहुल नार्वेकर म्हणाले...

अजित पवार (Ajit Pawar) गटाची 30 जूनच्या बैठकीबाबत अनेक गोष्टी सिद्ध झालेल्या नाहीत. माणसे बोलवायची सह्या करून घ्यायच्या, असे बहुमत होतो का. त्यासाठी ना कुठल्या बैठका ना कुठल्या चर्चा. यातील अनेकांना कशासाठी सही करतोय हेही माहिती नव्हते, असा दावाही पाटलांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरही बोट ठेवले. ते म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) हेच आमचा पक्ष. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आहे. आता निवडणूक आयोगाने लवकरात लवकर चिन्ह द्यावे. कुणी फूट पाडून पक्ष पळवून नेत असेल तर उरलेल्या लोकांची अडचण होते. ती टाळण्यासाठी आयोगाने अशा पक्षांना संरक्षण द्यावे. त्यांना प्राधान्याने पक्ष नाव आणि चिन्ह द्यावे. त्यामुळे त्यांना लोकांत जाऊन पक्ष आणि चिन्हाचा प्रचार करता येईल, अशी अपेक्षाही पाटलांनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Jayant Patil
Rahul Narwekar on NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा कसा? नार्वेकरांनी सांगितले 7 ठळक मुद्दे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com