Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Eknath Shidne : "काळ कसोटीचा, बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी..." शिवसेनेच्या मंत्री अन् आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Shivsena Ministers Controversy : मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे शिंदे गटावर टीका करण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीत मिळालं.

Jagdish Patil

Mumbai News, 15 Jul : मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला.

यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे गटावर टीका करण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. याच सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना काचपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटाची एक काल एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला वादग्रस्त मंत्री आणि आमदार देखील उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी आमदारांना, तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी असून चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका, असा सल्ला दिला आहे.

बैठकीत एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला आणि जास्त काम करा. मागील काही दिवसांत अनेक गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं शिवाय लोक तुमचे आमदार काय करतात? असा प्रश्न मला विचारतात.

दरम्यान, यावेळी त्यांनी आमदार आणि नेत्यांना इशारा देखील दिला आहे. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली. शिवाय त्यांनी सत्तेची हवा आपल्या डोक्यात जाऊ देऊ नका असा सल्लाही आपल्या आमदारांना दिला. ते म्हणाले, "आपल्या परिवारावर कारवाई करायला मला अजिबात आवडणार नाही.

परंतु, मला कारवाई करायला भाग पडणार नाही असं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुख सारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखा वागतो. तुम्हीही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका. कितीही पदं मिळाली तरी आपण कार्यकर्ता आहे असं समजूनच कामं करा."

कमी वेळात जास्त यश मिळाल्यामुळे लोकं आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळेच बदनामीचा डाव रचला जात आहे. यासाठी काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात, असा कानमंत्र शिंदेंनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT