Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Election Result : तीन राज्यांत भाजपचा विजय; अजित पवार म्हणाले, 'देशाला मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही'

Ajit Pawar On Pm Modi : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

Ganesh Thombare

Mumbai News: देशातील राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांचा निकाल जवळपास स्पष्ट होत आला असून, भाजप बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे, तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या हातातून सत्ता निसटत काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे.

भाजपला तीन राज्यांत बहुमत मिळत असल्याने 'एनडीए'तील नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजपचा चेहरा मोदीच आहेत हे त्रिवार सत्य असून, नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असं ते म्हणाले आहेत.

"मी आधीच म्हटलं होतं, की निकाल चांगलाच लागेल. पंतप्रधान मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यांतील लोकांनी भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे जनतेचा कौल मान्य केला पाहिजे. मात्र, 'इंडिया आघाडी'वाले आता 'ईव्हीएम'बाबत बोलतील, पण जनतेने भाजपवर आत्मविश्वास दाखवला आहे. मोदी दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास आहे. कारण गेल्या दहा वर्षांत मोदींनी अनेक चांगली कामं केली आहेत, असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असून, गेल्या दहा वर्षांत त्यांनी अतिशय चांगल्या योजना राबवल्या आहेत, पण या निवडणुकीत काहींनी नको तेवढा आत्मविश्वास दाखवला," असा टोलाही उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना लगावला. तसेच मोदींपुढे दुसरा कोणीही चेहरा नाही, असेही पवार म्हणाले.

याचवेळी तेलंगणामध्ये काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे, याबाबत बोलताना अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी हे एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते. मात्र, काँग्रेसने त्यांना त्यांच्याकडे घेतले, अन्यथा तेलंगणातदेखील आज चित्र वेगळं असतं, असं मोठं विधान त्यांनी केलं.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT