Loksabha Election : इंडिया आघाडीची जमवाजमव सुरू; 28 पक्षांना दिले निमंत्रण

India Alliance: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकामुळे इंडिया आघाडीची बैठक झाली नव्हती.
India Alliance
India AllianceSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी 28 पक्षांना एकत्रित करीत इंडिया आघाडीची मोट बांधली आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीची बैठक झाली नव्हती. मात्र, रविवारी पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच विरोधी इंडिया आघाडीची चौथी बैठक 6 डिसेंबरला दिल्लीत होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Malikarjun Kharge) यांनी सर्व 28 विरोधी पक्षांना या बैठकीसाठी बोलावले आहे.

India Alliance
Assembly Election Results 2023 : मंदिर पॉलिटिक्सचा फंडा; मध्य प्रदेश, राजस्थानात जोरात

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर चर्चा होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी घोषित झाले, तर मिझोरममध्ये 4 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

आघाडीची शेवटची आणि तिसरी बैठक 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरला मुंबईत झाली होती. या बैठकीत इंडिया आघाडीने समित्या स्थापन केल्या होत्या. यामध्ये प्रचार समिती, समन्वय, रणनीती समिती, मीडिया, सोशल मीडिया आणि संशोधन समिती यांचा समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीत 28 विरोधी पक्षांनी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीची रणनीती तयार केली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडी स्वतंत्रपणे लढली होती. त्यामुळे यावर समाजवादी पक्षाने (samjvadi party) टीका केली होती. त्यामुळे हा मुद्दा बैठकीत चर्चेत येऊ शकतो.

लोकसभेच्या जागावाटपावर चर्चेची शक्यता

इंडिया आघाडीची दुसरी बैठक १७-१८ जुलैला बंगळुरू येथे पार पडली होती, तर पहिली बैठक 23 जूनला पटना येथे पार पडली होती. आगामी काळात हॊणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या इंडिया आघाडीची रणनीती ठरणार आहे. त्यासोबतच इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sachin Waghmare)

India Alliance
Mallikarjun Kharge : आमच्या एका उमेदवारासमोर भाजपचे तीन उमेदवार; ईडी, सीबीआय अन् इन्कम टॅक्स : खर्गेंचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com