Cabinet Expansion : Cabinet Expansion Of Maharashtra : Sarkarnama
मुंबई

Cabinet Expansion : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त; कुणाकुणाला मिळणार संधी?

Cabinet Expansion Of Maharashtra : सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार..

सरकारनामा ब्यूरो

Cabinet Expansion Of Maharashtra : राज्य सरकारातील मंत्रिमंडळ विस्तार अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना आणि भाजप (BJP) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ मे नंतर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिरवा कंदील दाखवल्याची खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे.

पहिल्या मंत्रिमंडळात शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. आता शिंदे गटाकडून आमदार बच्चू कडू, आमदार संजय शिरसाट, प्रतोद भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव, आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर खळबळजनक दावा केला आहे. शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काहीही उरलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्याकडे राहिलेले आमदारही आमच्याकडेच येतील, असा दावा शिरसाटांनी केला आहे.

दरम्यान, १५ मे पूर्वी राज्यातील सत्तासंघर्षाचा निकालही अपेक्षित आहे. सत्तासंघर्षाचा निकाल आणि मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार याचं टायमिंग जुळून येणार का? तसेच, सत्तासंघार्षाचा अद्याप निकाल आलेला नसताना, मंत्रिमंडळाचा विस्तार होणे, याबाबत संदिग्धता आहे. निकाल कुणाच्या बाजूने येतो, यावर मंत्रिमंडळाचाविस्तार होणे किंवा न होणे अवलंबून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT