Raj Thackeray Meets Eknath Shinde Sar
मुंबई

Raj Thackeray: आधी शिवसेनेला मदत, आता थेट एकनाथ शिंदेंची भेट! राज ठाकरे वाटचाल पुन्हा बदलणार?

Raj Thackeray Meets Eknath Shinde: या भेटीमुळं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंनी थेट शिंदेंची भेट घेतल्यानं त्यांचा प्रवास पुन्हा उलट्या दिशेने सुरु होतोय की काय? अशी चर्चा होत आहे.

Amit Ujagare

Raj Thackeray Eknath Shinde Meeting : महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मदत केल्यानंतर आता राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. या भेटीमुळं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंनी थेट शिंदेंची भेट घेतल्यानं त्यांचा प्रवास पुन्हा उलट्या दिशेने सुरु होतोय की काय? अशी चर्चा होत आहे.

नेमका विषय काय?

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंची साथ देणाऱ्या राज ठाकरेंनी आज अचानक ठाकरेंचे कट्टर विरोध असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे हे बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर भेटीसाठी पोहोचले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा यथोचित स्वागत केलं, त्यानंतर त्यांच्यामध्ये काहीकाळ चर्चाही झाली. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे पण त्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळं ही भेट नेमकी कशासाठी झाली? याची चर्चा आता सुरु झाली आहे.

राजकीय हेतू काय?

ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे राज्यातील दोन पक्षांचे प्रमुख आहेत, महत्वाचे नेते आहेत. त्यामुळं स्वाभाविकच भेटीच्या चर्चा होतात, पण राजकारणात कधीही कोणी कोणाचा शत्रू नसतो हे देखील यामुळं अधोरेखित झालं आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये महत्वाचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्यासारखं महत्वाचं खात त्यांच्याकडं आहे. त्यामुळं काही सरकारी कामानिमित्त किंवा विकासकामांसाठी देखील अशा प्रकारे नेत्यांच्या भेटी होत असतात. पण या भेटीमागे आणखी वेगळा काही राजकीय हेतू तर नाही ना? याची उत्सुकता चर्चा करणाऱ्यांमध्ये आहे.

शिवसेनेत नाराजी दिसणार

दरम्यान, राज ठाकरेंनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र यामुळं नाराजी दिसून येऊ शकते. या भेटीवर काहीतरी प्रतिक्रिया आल्यास वावगं ठरू नये. महापालिका निवडणुकीनंतर कल्याणमध्ये मनसेनं शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणं इतर काही राजकीय समिकरण जुळवण्याचा यानिमित्त प्रयत्न आहे का? हे नंतर समजू शकेल. पण सध्या तरी ही भेट केवळ सदिच्छ भेट असल्याचं दोन्हीकडंच्या सुत्रांकडून कळतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT