Shivsena, BJP Sarkarnama
मुंबई

Shivsena News : माजी खासदार सहा महिन्यातच बदलणार पुन्हा पक्ष; पालघर विधानसभेसाठी कोणाला मिळणार संधी ?

Political News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली आहे. त्यातच पालघर विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळत आहे.

येथील माजी खासदार राजेंद्र गावीत यांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी पक्ष बदलला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

पालघर विधानसभेसाठी अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे याठिकाणी कोण उमेदवार असणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असून पालघर विधानसभा मतदारसंघातून नेमकं कोणाला उमेदवारी देण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालघर मतदारसंघातून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Wanga) यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याजागी भाजपमधून राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्यावर विश्वास ठेवलेल्या श्रीनिवास वनगा यांचा विश्वास सार्थ ठरणार की फोल हे लवकरच स्पष्ट होईल.

विशेष म्हणजे श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण देतच शिंदेंकडून बंडाची ठिणगी पडली होती. तर, ज्यांनी लोकसभेला तिकीट न मिळाल्याने शिंदेंना सोडले होते, त्यांनाच पुन्हा पक्षात घेऊन विधानसभेला संधी देण्याचे राजकारण होत आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांची पुन्हा शिवसेना शिंदे गटात पुन्हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकांवेळी गावित यांना तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता विधानसभेला तिकीट मिळणार असल्याने गावितांचा पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पालघरचे माजी आमदार विलास तरे हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते.

आगामी काळात होत असलेल्या पालघर विधानसभेसाठी राजेंद्र गावित तर बोईसर विधानसभेसाठी विलास तरे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे, हे दोन्ही नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती आहे. पालघर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे सध्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीवर सध्या टांगती तलवार आहे. त्यामुळे येत्या काळात आमदार वनगा यांची उमेदवारी कापून कोणाला दिली जाणार याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT