Devendra Fadnavis explains fund distribution issue Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : 'कॉन्फिडन्स संपला की पक्षही संपतो'! ठाकरेंचे सहा खासदार फुटण्यामागे CM फडणवीसांनी सांगितलं निधीपेक्षाही मोठं कारण

Devendra Fadnavis on MP fund distribution: ठाकरेंचे सहा खासदार नुकतेच फुटले आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडण्यामागे त्यांनी आम्हाला निधी मिळत नसल्याचं सांगत जनतेच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षात गेल्याचा दावा केला होता.

Amit Ujagare

Maharashtra fund allocation latest news: ठाकरेंचे सहा खासदार नुकतेच फुटले आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडण्यामागे त्यांनी आम्हाला निधी मिळत नसल्याचं सांगत जनतेच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याशिवाय आमच्याकडं पर्याय नव्हता असं या खासदारांनी सांगितलं होतं.

यावरुन राज्यात बराच गदारोळ झाला, भाजपवर जोरदार टीकाही झाली. याच टीकेवर नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी सरकारची आणि पर्यायानं भाजपची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

खासदारांच्या या निधीच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस सांगतात, "मला असं वाटतं की अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकतं. कारण निधीचा अर्थ केवळ निधी इतक्या पुरता मर्यादित नसतो. काही प्रकल्प असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे पायाभूत सुविधांचे विषय असतात तर काही सामाजिक विषयही असतात, काही कार्यालयीन विषयही असतात. अर्थातच आपण जेव्हा सत्ता पक्षात असतो किंवा विरोधात असतो त्याच्यावर थोडा परिणाम होतोच. शेवटी सत्ता पक्षात असलं तर आपल्या आमदार-खासदारांना थोडं जास्त मिळालं पाहिजे असा प्रयत्न असतो. पण हे एकमेव कारण आहे असं माझं मत नाही. मुळामध्ये जेव्हा नेतृत्व हे खासदारांना प्रोत्साहित करणं बंद करतं, त्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते." 'मुंबई तक'च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

राजकारणात एक लक्षात ठेवा की, प्रत्येक जण भविष्य पाहत असतो. त्याला जर लक्षात आलं की, ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय ते माझं भविष्य सुरक्षित करू शकत नसतील किंवा सत्ता आली पाहिजे असा विषय नसतो, परंतू माझ्यासाठी ते किंवा ज्या विषयाकरता आम्ही आहोत त्यासाठी पक्ष नेतृत्व लढाई करतंय का?

ते मैदानात उतरतंय का? ते त्याच्यामध्ये काही कष्ट घेत आहेत का? अशा सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की, जर सगळं काही नेहमीप्रमाणेच चाललेलं आहे तर, याचा अर्थ असा आहे की, इथे पुढे भविष्य नाही आणि मग जिथे भविष्य असेल तिथे तो जाण्याचा प्रयत्न करतो.

आम्ही पण विरोधी पक्षात होतो. 2019 ते जवळपास 2022 पर्यंत म्हणजे अडीच वर्षे. या अडीच वर्षांमध्ये आमच्यासोबतचा एकही आमदार गेला नाही. निधी मिळायचा का? तर नाही. म्हणजे मी तरी आता दिलाय, आम्हाला तर एकही पैसा मिळाला नाही. पण अडीच वर्षे सातत्यानं आमच्या लोकांना घेऊन आम्ही भांडत राहिलो.

विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरलो नाही. आम्ही एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही. त्यामुळं जे सोबतचे लोक होते त्यांना किमान हा आत्मविश्वास होता की ज्या नेत्यांसोबत आपण काम करतोय तो आज ना उद्या आपल्याला सत्तेपर्यंत नेऊ शकतो किंवा याच्यासोबत आपलं भविष्य अंधकारमय नाही असं ज्यावेळेस वाटतं, त्यावेळी लोकं तुमच्यासोबत उभे राहतात.

आम्ही 15 वर्षे विरोधी पक्षात होतो, आमचे नेते मुंडे साहेब होते. मुंडे साहेब ज्या प्रकारे आमच्याशी वागायचे, सभागृहातला त्यांचा वावर यामुळं आम्हाला असं वाटायचं की जरी आपण विरोधी पक्षात असलो तरी या नेत्यात ताकद आहे. लीड फ्रॉम फ्रंट. त्यामुळं कुठल्याही पक्षामध्ये हे महत्त्वाचं आहे की नेत्यानं आत्मविश्वास दिला केला पाहिजे. तो इन्स्पायर होणं जेव्हा बंद होतं आणि भविष्य दिसत नाही पक्ष संपतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT