

Ketan Agarwal Murder : लग्न ठरलेलं असताना होणाऱ्या पतीला लोहगडावरुन ढकलून देऊन त्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या कथित प्रकरणात पोलिसांना ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. यासाठी त्यांनी आता कोर्टाकडं महत्वाची मागणी केली आहे.
केतन अगरवाल हत्या प्रकरणात केतनला लोहगडाच्या कड्यावरुन नेमकं कोणी ढकललं याचे ठोस पुरावे अद्याप पोलिसांना मिळू शकलेले नाहीत. त्यामुळं गुरुवारी पुणे पोलिसांनी कोर्टात धाव घेतली आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सिया गोयल हिची पॉलिग्राफ चाचणी (लाय डिटेक्टर) करण्याची मागणी केली. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीच्या जबाबानुसार केतनला दरीत ढकलल्याचा थेट कोणाताही प्रत्यक्षदर्शी किंवा निर्णायक पुरावा उपलब्ध नाही.
याप्रकरणी पोलिसांनी आधीच मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्यांची पॉलिग्राफी चाचणी ही तपासात महत्वाची लीड मिळण्यासाठी महत्वाचा भाग ठरू शकते, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, सियाचे वकील अॅड. विपुल दुशिंग यांनी सांगितलं की, सियाच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी कोर्टात पोलिसांनी अर्ज केला असला तरी या चाचणीपूर्वी अनेक कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोर्टानं जरी परवानगी दिली तरी आरोपीची लाय डिटेक्टर चाचणीसाठी सहमती असणं आवश्यक असतं, त्याशिवाय ही चाचणी करता येणार नाही.
बुधवारी, पुणे ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली की, केतन अग्रवालचा मोबाईल त्याच्या कुटुंबीयांकडं सोपवण्यापूर्वी काही काळ सिया गोयलच्या ताब्यात होता; त्यामुळं या काळात त्यातील कोणताही पुरावा नष्ट केला गेला आहे का? किंवा त्यात काही फेरफार केले गेले आहेत का? याची तपास अधिकारी पडताळणी करत आहेत. तपासाचा एक भाग म्हणून, घटनाक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी पोलिसांनी १ जुलै रोजी लोहगड किल्ल्यावर चेतन चौधरीच्या उपस्थितीत घटनास्थळाचं दृश्य पुन्हा उभं केलं. रविवारी सिया गोयलसोबतही अशीच प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी कड्यावरून खाली पडण्याच्या कथित घटनेचे दृश्य पुन्हा साकारण्यासाठी तपास पथकानं केतन अगरवाल याच्या वजनाचा एक 'डमी' पुतळा तयार केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.