Bjp Mla Ganesh Gaikwad Firing Case :
उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी आज गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील चोप्रा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी गायकवाड हे केवळ दोन मिनिटातच कोर्टातून बाहेर आले.
कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 12 दिवसांची आमदार गायकवाड यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती आरोपीचे वकील राहुल आरोटे आणि उमर काझी यांनी दिली. या व्यतिरिक्त आम्ही काहीही सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. पण आमदार गायकवाड यांनी कोर्टात मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या र गंभीर आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यात राजकीय वैमानस्य होते. यातून यापूर्वीही अनेकदा त्यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. मात्र द्वारली गावातल्या एका जमिनीच्या प्रकरणात आमदार गायकवाड यांच्यावर जमीन हडप केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी महेश गायकवाड हे तक्रारदारांबरोबर हिल लाईन पोलिस स्टेशन उल्हासनगर येथे आले होते. यावेळी आमदार गायकवाडही येथे आले. उल्हासनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसलेल्या महेश गायकवाडांवर बेछूट गोळीबार केला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी फेटाळली
या संदर्भातच आज गायकवाड यांना उल्हासनगर येथील कोर्टात हजर केले होते. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाणार, असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळली. त्यांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा'
यावेळी आरोपीच्या वकिलांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटिव्ही फुजेटचे सुरक्षित ठेवण्याची मागणी केली. ही मागणी कोर्टाने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. हा आदेश न्यायमूर्ती ए. ए. निकम यांनी दिला. दरम्यान, कोर्टात हजर केल्यावर सुनावणीदरम्यान आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात आपल्या मुलाचा काहीही संबंध नसताना मुख्यमंत्र्यांनी मुद्दाम त्याचेही नाव गोवले, असा आरोप गणपत गायकवाड यांनी कोर्टात सुनावणीदरम्यान केल्याचे सांगण्यात येत आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.