Ganpat Gaikwad Firing : ज्या वादातून महेश गायकवाडांवर हल्ला, ते तक्रारदारच समोर; केली 'ही' मोठी मागणी

Ganpat Gaikwad Firing Mahesh Gaikwad : हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाडांनी महेश यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.
Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad, Mahesh GaikwadSarkarnama
Published on
Updated on

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड ( Mahesh Gaikwad ) यांच्यावर गोळीबार केला. आमदारांनी महेश गायकवाडांवर सहा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पण, ज्या जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला, त्यातील तक्रारदारांनी आता संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शुक्रवारी आमदार गायकवाडांनी महेश यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यात एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होतं.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार गायकवाड यांचा मुलगा आणि महेश हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होतं. तेथे त्यांच्यात पोलिसांसमोर वाद सुरू होता. तेव्हाच आमदार गायकवाडही तेथे आले. त्यांनी पोलीस ठाण्यात महेश आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर एकच खळबळ उडाली.

पण, ज्या जमिनीच्या वादातून आमदार गायकवाडांनी महेश यांच्यावर गोळीबार केला होता, त्याच्या तक्रारदारांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच, तक्रारदारांनी आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ जाधव आणि ज्योत्स्ना जाधव, अशी तक्रारदारांची नावे आहेत.

Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : आमदार गायकवाडांनी 'या' कारणामुळे केला महेश गायकवाडांवर गोळीबार

तक्रारदारांनी सांगितलं, "आमची नांदीवली तलावाजवळ पावणे पाच एकर जागा आहे. 1996 साली प्रमोद रांका यांना जागा विकली होती. मात्र, रांका यांनी पहिल्यांदा थोडे पैसे दिले आणि नंतर बाकीचे देऊ असं आश्वासन दिलं. पण, परत बाकीचे पैसे देण्यात आले नाहीत. त्यानंतर आमदारांनी रांक यांना स्वत:च्या पक्षात सहभागी करून घेतलं. 1 फेब्रुवारीला आमच्या शेतातील जागेवर कंपाऊंड घालण्यास सुरूवात केली. त्यातून वादाला सुरूवात झाली. तसेच, सात दिवसांपूर्वी साताबारा रांका यांच्या नावावर करण्यात आला."

Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
Chhagan Bhujbal news : ' ...त्यांनी थोडा गोळीबार करायला सांगितला होता!'; गृहमंत्री फडणवीसांच्या मदतीला धावले भुजबळ

"याबाबत आम्ही महेश यांच्याकडे दाद मागितली. महेश यांनी न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. पण, येथे आमदारांनी महेश यांच्यावर हल्ला केला. उद्या आमच्यावरही हल्ला केला जाईल. गरिबाला ते मारू शकतात. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे," अशी मागणी तक्रारदारांनी केली.

Edited By : Akshay Sabale

Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
Nana Patole : महाराष्ट्रातील सरकार लुटारू, डाकुंचे; सामान्यांना लुटत आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com