Ravindra Phatak, Rajan Vichare, Eknath Shinde, Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Family : ठाण्यात राजकीय घराणेशाहीचा विजय असो..!

Pankaj Rodekar

Thane Political News :

घराणेशाहीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी जाहीरपणे टीका करताना दिसतात. प्रत्यक्षात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षात घराणेशाही अस्तित्वात असल्याचे स्पष्ट दिसते. याला ठाण्याचाही अपवाद नाही.

राज्याच्या राजकारणात घराणेशाहीवरून वर्षानुवर्षे सातत्याने आरोप होत आहेत. मात्र ठाणे शहरात घराणेशाही अक्षरशः उफाळून आल्याचे दिसत आहे. एका घरातील दोघे नाही तर तिघे-चौघे जण राजकारणात दिसत आहेत. म्हणजे एक-दोन पिढ्या नाही तर राजकारणात तिसरी पिढीही येऊन वडिलोपार्जितपदासाठी दावेदारी ठोकताना दिसत आहे.

अशा राजकीय घराणेशाहीमुळे त्यांच्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त सतरंजीच उचलायची का, असाच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही घराणेशाही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नसून ती ठाण्यातील बहुतांशी सर्वच पक्षात पाहायला मिळत आहे.

'ठाणे तेथे काय उणे' असे म्हटले जाते. याच ठाण्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेची वाट दाखवून दिली. अद्याप शिवसेनेचा भगवा तितक्या डौलात डोलत आहे. हळूहळू सर्वच पक्षांनी आपापली पाळेमुळे ठाण्यात रोवली. त्यातून राजकारणात सक्रिय झालेल्या आणि राहणाऱ्या नेतेमंडळींच्या पिढ्यान् पिढ्या पुढे येण्यास सुरुवात झाली, तीच परंपरा आजही सुरू आहे. मग याला शिवसेना (ShivSena), काँग्रेस (Congress) किंवा राष्ट्रवादी (NCP) असो वा भाजप (BJP) कुणाचाही अपवाद नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

* प्रस्थापित नेतेमंडळी आणि परिवार

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाऊ प्रकाश शिंदे (माजी नगरसेवक)

2. आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) (शिंदे गट), त्यांच्या पत्नी परिषा आणि मुलगा विहंग, तसेच पूर्वेश (तिघे माजी नगरसेवक)

3. माजी आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak) (शिंदे गट), त्यांच्या पत्नी जयश्री आणि भावजय राधिका (दोघी माजी नगरसेविका)

4. खासदार राजन विचारे (Rajan Vichare) (ठाकरे गट), त्यांच्या पत्नी नंदिनी, पुतण्या मंदार (माजी नगरसेवक)

* स्थानिक नेते आणि परिवार

1. ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर (शिंदे गट) : मुलगा संजय, सून उषा आणि मुलगा भूषण (माजी नगरसेवक)

2. माजी महापौर मनोहर साळवी (राष्ट्रवादी काँग्रेस) : मुलगा मिलिंद आणि सून अपर्णा (माजी नगरसेवक)

3. ज्येष्ठ माजी नगरसेवक कृष्णा पाटील (भाजप) : पत्नी नंदा (माजी नगरसेविका)

4. ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किणी (शिंदे गट) : पत्नी अनिता आणि भाऊ मोरेश्वर (माजी नगरसेवक)

5. ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटील (राष्ट्रवादी-शरद पवार गट) : पत्नी मनाली (माजी नगरसेवक)

6. माजी महापौर एच. एस. पाटील (शिंदे गट) : पत्नी कल्पना (माजी नगरसेविका)

या नेतेमंडळींच्या कुटुंबातून राजकारणात येणारे

1. आमदार जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी-शरद पवार गट) - ऋता आव्हाड (पत्नी)

2. खासदार राजन विचारे (ठाकरे गट) - धनश्री (मुलगी)

3. माजी आमदार सुभाष भोईर (ठाकरे गट) - सुमित (मुलगा)

4. माजी महापौर नरेश म्हस्के (शिंदे गट) - आशुतोष (मुलगा)

5. ज्येष्ठ माजी नगरसेविका प्रमिला केणी (राष्ट्रवादी-शरद पवार गट) - मंदार (मुलगा)

6. ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय भोईर (शिंदे गट) - विघ्नेश (मुलगा)

7. ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले (भाजप) - वृषाली (मुलगी)

8. ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण (भाजप) - ओंकार (मुलगा)

9. ज्येष्ठ माजी नगरसेवक शानू पठाण (राष्ट्रवादी-शरद पवार गट) - मर्झिया (मुलगी)

10. ज्येष्ठ माजी नगरसेवक रमाकांत मढवी (शिंदे गट) - साक्षी (मुलगी)

11. ज्येष्ठ माजी नगरसेविका पूजा वाघ (शिंदे गट) - प्रसाद (मुलगा)

12. ज्येष्ठ माजी नगरसेवक कृष्णा पाटील (भाजप) - सचिन (भाऊ)

13. ज्येष्ठ माजी नगरसेवक एच. एस. पाटील (शिंदे गट) - विकी (मुलगा)

14. ज्येष्ठ माजी नगरसेवक सुधीर कोकाटे (शिंदे गट) - विराज (मुलगा)

16. ज्येष्ठ माजी नगरसेविका मीना मालुसरे (शिंदे गट) - सुयोग ( मुलगा)

17. ज्येष्ठ माजी नगरसेवक भूषण भोईर (शिंदे गट) - सपना (पत्नी)

18. ज्येष्ठ माजी नगरसेविका रुचिता मोरे (शिंदे गट)- राजेश (पती)

19. ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय पांडे (शिंदे गट) - सिद्धार्थ (मुलगा)

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT