Maharashtra Government Schemes 
मुंबई

Closed Govt Schemes: निवडणुकीच्या तोंडावर योजनांच्या खैराती! किती बंद पडल्या? भास्कर जाधवांनी यादीच दाखवली वाचून

Government Schemes: राज्यातील महायुती सरकारनं गेल्या सरकारच्या काळात निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केलेल्या सरकारी योजनांचं पुढे काय झालं? याची माहिती भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत दिली.

Amit Ujagare

Government Schemes: राज्यातील महायुती सरकारनं गेल्या सरकारच्या काळात निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केलेल्या सरकारी योजनांचं पुढे काय झालं? याची माहिती भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत दिली. यांपैकी किती योजना बंद पडल्या आहेत? याची यादीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली.

विधानसभेत भास्कर जाधव यांनी बंद पडलेल्या सरकारी योजनांची यादीच वाचून दाखवली. जाधव म्हणाले, निवडणुकीपूर्वी लोकांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं. कुठं गेला आनंदाच शिधा, या योजनेच्या घोषणेनंतर दसरा आला नाही? दिवाळी आली नाही? कुठे गेला आनंदाचा शिधा त्यावेळी स्वतःचे स्टिकर लावून जाहिराती केल्या पण आता ही योजना कुठे गेली? असा सवाल त्यांनी केला. तसंच...

कुठल्या योजना बंद पडल्या?

  1. मुख्यमंत्री आनंदाचा शिधा योजना

  2. स्वच्छता मॉनिटर योजना

  3. लाडक्या भावांना तुम्ही अॅप्रेंटशिपचा कोर्स देणार होते त्याचं काय झालं?

  4. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

  5. एक रुपयात, पीक विमा योजना

  6. एक राज्य, एक गणवेश

  7. योजना दूत

  8. नमो कामगार कल्याण योजना

  9. नमो शेतकरी अभियान योजना

  10. नमो शेततळं योजना

  11. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना

  12. नमो ग्रामसचिवालय योजना

  13. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना

  14. नमो दिव्यांगशक्ती योजना

  15. नमो तीर्थस्थळ गडकिल्ले संवर्धन योजना

    या सरकारी योजना निवडणुकीच्या तोंडावर घोषित झाल्या आणि आता त्या बंद पडल्या, असा दावा विधानसभेत भास्कर जाधव यांनी केला.

'लाडकी बहीण'मुळं कर्जाचा डोंगर नाही - जाधव

कुठे गेल्या या योजना निवडणुकीसाठी लोकांसमोर हे फंडे आणले लोकांच्या भावनांना हात घातला. महिलांना सांगितलं की, निवडणूक झाल्यावर २१०० रुपये देऊ. आज राज्याच्या डोक्यावर ९ लाख ३२ हजार कोटींचं कर्ज आहे. तुम्ही सगळे लबाड आहात, तुम्ही आमच्या बहिणीच्या नावानं खापर फोडत आहात. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहिती नाही, पण माझं पहिल्या दिवसापासून ठाम मत आहे. महाराष्ट्राच्या डोक्यावर हा कर्जाचा डोंगर झालाय तो आमच्या लाडक्या बहिणींमुळं नाही.

आठवा निवडणुकीपूर्वी सरकारनं पुरवणी बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. आज तुम्हाला इतके पैसे लागत नाहीत केवळ ३२-३३ हजार कोटी रुपये फक्त लागत आहेत. २ कोटी ५३ लाख महिलांच्या खात्यात निवडणुकीपूर्वी तुम्ही १५०० रुपये टाकलेत. कोणीही मागणी न करता तुम्ही हे पैसे त्यांच्या खात्यात टाकले. पण नंतर ५७ लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारण सांगून कमी केलंत, असा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT