Ajit Pawar Smarak: अजित पवारांच्या स्मारकाबाबत विधानसभा अध्यक्षांची मोठी घोषणा! विधानभवन परिसरात उभारणार स्मृतीस्थळ

Ajit Pawar Smarak: राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवारांची दैदिप्यमान राजकीय कारकीर्द राहिली आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुराही सांभाळू शकतील इतकी त्यांची क्षमता होती.
Ajit Pawar
Ajit Pawar
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवारांची दैदिप्यमान राजकीय कारकीर्द राहिली आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुराही सांभाळू शकतील इतकी त्यांची क्षमता होती. अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या दिवंगत नेत्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचं स्मारक उभारण्याचा विचार विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. या स्मारकाची जागाही निश्चित करण्यात आली असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत शोक प्रस्तावादरम्यान बोलताना सांगितलं.

Ajit Pawar
MPs Group: लोकसभा अध्यक्षांचा विश्वास! संजय राऊत, सुप्रिया सुळे, गौरव गोगोई मजबूत करणार भारताचे जागतीक संबंध

राहुल नार्वेकर म्हणाले, "अजितदादांसारखे थोर नेते फार कमी होतात. पुढच्या पिढीला या नेत्यांबद्दल आणि या नेत्यानी महाराष्ट्राची जी सेवा केली आहे. ज्या प्रकारे त्यांनी आपलं राजकीय जीवन जगलं आहे, याची जाणीव राहण्यासाठी अजितदादांच्या नावाचं एक स्मृतीस्थान या विधीमंडळाच्या आवारात होणं गरजेचं आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांसोबत, गटनेत्यांसोबत आणि बोर्डासमोर हा प्रस्ताव ठेवून येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेईन"

Ajit Pawar
Sajid Khan Pathan threat : “दोन दिवसात 10 कोटी दे, नाही तर..!” भाजप पाठोपाठ काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगचा 'गेम ओव्हर'चा मेसेज

दरम्यान, अजित पवारांच्या अपघाती निधनामुळं अवघ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला आहे. पण त्यांच्या आठवणी जपण्याच्या हेतून महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांचं स्मारक उभारण्याचे प्रस्ताव समोर आले आहेत, यामध्ये....

Ajit Pawar
BJP News : अमित देशमुखांविरोधात लढल्या पण पराभूत झाल्या; थोडक्यात आमदारकी हुकलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपमध्ये 'मानाचे पान'

या ठिकाणी स्मारकाचा प्रस्ताव

  1. पिंपरी-चिंचवड : भाजप आमदार महेश लांडगे यांनी सर्वात आधी (जानेवारी २०२६ मध्ये) नवीन महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली. याला 'अजित सृष्टी' असं नाव देण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं होतं. ही मागणी सर्वपक्षीय पाठिंब्यासह महापालिकेत मंजूरही झाली आहे. अजित पवारांचं पिंपरी-चिंचवड शहराच्या उभारणीतील प्रमुख योगदान लक्षात घेऊन ही मागणी केली गेली आहे.

  2. कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेत (फेब्रुवारी २०२६) ठराव मंजूर करून स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिरोली जकात नाका किंवा शहराच्या प्रवेशद्वाराजवळ हे स्मारक उभारण्याची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी याबाबत जोरदार मागणी केली होती.

  3. सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेने भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली. अजित पवार यांच्या शेतकरी-विकास कार्याचा उल्लेख करून ही मागणी करण्यात आली.

  4. बारामती : त्याचबरोबर पवार कुटुंबीयांकडून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात स्मारक (पूर्णाकृती पुतळा) उभारण्याची योजना आखली गेली आहे. शरद पवार यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे.

  5. बीड : बीडमध्येही खासदार बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखाना परिसरात अजित पवारांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली.

  6. रत्नागिरी : तसंच रत्नागिरीसारख्या ठिकाणीही अजित पवारांच्या स्मृती जपण्यासाठी छोट्या शिल्प/स्मारकाची चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com