Manoj Jarange Patil Mumbai High Court Sarkarnama
मुंबई

Mumbai High Court : जरांगेंनी 'या' मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करावी, न्यायालयाचे निर्देश; वकील म्हणाले...

Akshay Sabale

राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण ( Maratha Reservation ) दिलं आहे. याचा कायदा विशेष अधिवशेनात मंजूर करण्यात आला. पण, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी, या मागणीवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारीपासून आंदोलनाची हाक दिली आहे. या प्रकरणी आज ( 23 फेब्रुवारी ) उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ( Mumbai High Court On Manoj Jarange Patil Latest News )

या वेळी "आंदोलन हिंसक होणार नाहीत?" याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयानं जरांगे पाटलांना ( Manoj Jarange Patil ) दिले आहे, तर जरांगे पाटलांच्या वकिलांनी "आंदोलन शांततापूर्ण असेल," अशी हमी उच्च न्यायालयाला दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयात नेमकं काय घडलं?

"मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती आंदोलन कसं करणार आहे? आंदोलन हिंसक होणार नाही, याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्द्यांवर जरांगेंनी 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी," असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले.

तेव्हा, "आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल," अशी हमी जरांगे पाटलांच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

24 फेब्रुवारीपासून राज्यातील सगळ्या गावांत एकाचवेळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल. यापूर्वी जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता. मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती.

मनोज जरांगे पाटलांच्या सूचना काय?

  • प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे.

  • कोणीही जाळपोळ करायची नाही, परीक्षा चालू असल्याने आंदोलन शांततेत करा.

  • सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत आंदोलन करायचे आहे. ज्याला या वेळेत आंदोलन करायला जमले नाही, त्याने संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करावे.

  • परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आली, तर त्यांना दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर सोडा.

  • निष्पाप लोकांवर पोलिसांनी केसेस केल्या, तर पूर्ण गाव पोलिस स्टेशनला जाऊन बसा.

  • शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार, मंत्री यांना आपल्या दारात येऊन देऊ नका.

  • निवडणुकीची आचारसंहिता मोडू नका.

  • मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये. निवडणूक घेतली आणि प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या गाड्या गावात आल्या तर ताब्यात घ्या.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT