Jayant Patil-Prakash solanke-Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Vs Jayant Patil : सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द मी नव्हे, अजितदादांनी दिला होता; जयंत पाटलांचा पलटवार

Vijaykumar Dudhale

Karajt News : माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाचा शब्द देऊनही तो पाळला नाही, असा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला जयंत पाटील यांनीही तेवढ्याच चतुराईने उत्तर दिले आहे. शरद पवार आणि अजित पवारच पक्षाचे सर्व निर्णय घेत होते, त्यामुळे सोळंकेंना कार्याध्यक्ष करू नये म्हणून अजितदादांचा हात कोणी धरला होता. पण, सोळंके यांना तो शब्द मी नव्हे; तर अजित पवारांनी दिला होता, असेही त्यांनी सांगितले. (I did not promise to give Solanke post of working president ; Ajitdada gave : Jayant Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये दोन दिवसाचे शिबिर झाले. त्या शिबिरात समारोपाच्या भाषणात उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी आमदार प्रकाश सोळुंके यांच्या नाराजीचा विषय काढला. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद देण्याचा शब्द जयंत पाटील आणि मी दिला होता. मात्र, तो त्यांनी पाळला नाही, असा आरोप पवारांनी जयंंत पाटील यांच्यावर केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील म्हणाले की, प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होते, हे खरे आहे. पण, त्यांना संधी न मिळाल्यामुळे ते प्रचंड नाराज होते. पण, अजित पवार जेव्हा युती सरकारसोबत गेले, तेव्हा सोळंके यांना मंत्री करण्याची संधी मिळाली होती. ती त्यांनी का पूर्ण केली नाही, याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे.

मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. प्रकाश सोळंके यांना कार्याध्यक्ष व्हायचं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच सर्व काही ठरवत होते. त्यांनी सोळंके यांना कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला असता, तर ते यापूर्वीच कार्याध्यक्ष झाले असते, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

माझ्या प्रदेशाध्यक्षबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले असले तरी त्यावर मी योग्य वेळी बोलेन, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिला. मुळात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले प्रकाश सोळंके यांना आताच्या मंत्रिमंडळात घेणे आवश्यक होते. कारण त्यांना २०१९ मध्ये मंत्री व्हायचे होते, कार्याध्यक्ष नाही. पण, त्यावेळी त्यांचे समाधान करण्यासाठी अजित पवार यांनीच त्यांना कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला होता. हे त्यांनी माझ्या समोरच सांगितले होते. सोळंके यांना कार्याध्यक्ष करण्यासाठी त्यांचा कोणी हात धरला नव्हता, त्यामुळे सोळंके हे कार्याध्यक्ष झाले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT