Azra Sugar Factory Election : मुश्रीफ-बंटी पाटलांचा दोस्ताना तुटणार; ‘आजरा’ची निवडणूक लढविण्याची राष्ट्रवादीची घोषणा

Kolhapur Politics : आजरा कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने दोघांना एकमेकांच्या विरोधात लढावे लागणार आहे.
Hasan mushrif-Satej Patil
Hasan mushrif-Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली तलवार म्यान करून निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माघारीच्या दिवशी सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजरा कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. आतापर्यंत दोघांनीही मैत्री जपली. मात्र, आजरा कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने दोघांना एकमेकांच्या विरोधात लढावे लागणार आहे. (NCP's announcement to contest Azra Sugar Factory election)

आजरा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत अनेक दिवसांपासून सर्वपक्षीय आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांनी त्यासंदर्भात चर्चाही केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आमदार सतेज पाटील यांनी आजरा कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे मित्र असलेले आमदार विनय कोरे यांच्याशी हातमिळवणी करत आघाडी जाहीर केली.

Hasan mushrif-Satej Patil
Chavan Vs Mushrif : पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेस आघाडीची सत्ता गेली; हसन मुश्रीफांनी डागली तोफ

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी शुक्रवारी सकाळी सात वाजता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी धाव घेत नाराजी बोलून दाखवली. अखेर त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आजरा कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय पालकमंत्री मुश्रीफ यांना जाहीर करावा लागला. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड दबाव त्यांच्यावर टाकला.

थोड्याच वेळात आजरा तालुक्यातील उत्तूर येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये आघाडीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. लवकरच पॅनेलची घोषणा होणार आहे. आजच माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांची ही तारांबळ उडणार आहे.

Hasan mushrif-Satej Patil
Ahmednagar District Bank : नगर बँकेचं राजकारण तापलं; थोरात गट आक्रमक अन् सत्ताधारी विखे गटाची माघार, 107 कोटींचं...

दोघांची मैत्री आजऱ्यात तूटणार

पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सहकारात आपली मैत्री जपली आहे. मात्र, आजरा कारखान्याच्या निवडणुकीत ही मैत्री तुटण्याची शक्यता आहे. आमदार सतेज पाटील हे भाजपसोबत आहेत, त्यामुळे आजवर दोघांनीही जपलेली मैत्री आजरा कारखान्याच्या निवडणुकीत मात्र तुटली आहे.

Hasan mushrif-Satej Patil
Rajasthan Exit Polls 2023 : राजस्थानमध्ये पाच संस्थांच्या सर्व्हेनुसार भाजपची सत्ता, तर तीन संस्थांची काँग्रेसला पसंती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com