Rajan Vichare  Sarkarnama
मुंबई

Rajan Vichare : ठाण्यात ठाकरेंचा उमेदवार जाहीर, महायुतीत अजून 'विचार' सुरूच...

Thane Loksabha Election Constituency : विचारे हॅटट्रिक साधणार का ! शिंदे गटाकडून उमेदवाराची घोषणा झाल्यावर ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी अटीतटीची लढत पाहण्यास मिळेल, मग ठाणे हा गड नेमका कोणाचा हे या लढतीवरून स्पष्ट होईल.

Pankaj Rodekar

Thane Loksabha Election : शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विचारेंना लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून, त्यांना ही निवडणूक जिंकून हॅटट्रिक साधता येणार आहे. 2014 पेक्षा 2019 मध्ये विचारेंच्या पारड्यात लाखो मतं पडली होती. दोन्ही निवडणुकीत विचारेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा उमेदवार होता.

आता मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष ठाकरे गटासोबत आहेत. त्यातच ठाकरे गटाने ठाण्यातून उमेदवार म्हणून विचारेंचे नाव जाहीर केल्याने आता शिंदे गटाला तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी जणू विचार करावा लागणार आहे. चर्चेतील इच्छुकांपैकी किंवा अन्य वेळी यादीत नसलेला उमेदवार देण्याची खेळी खेळावी लागणार आहे. शिंदे गटाकडून उमेदवाराची घोषणा झाल्यावर ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी अटीतटीची लढत पाहण्यास मिळेल, मग ठाणे हा गड नेमका कोणाचा हे या लढतीवरून स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट (x) करून ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये 16 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये 12 नंबरवर ठाणे लोकसभा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. शिवसेना फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडल्याने ठाणे जिल्ह्यातून आमदार आणि माजी नगरसेवक ,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, पण खासदार विचारे यांनी ठाकरे गटासोबत राहून आपण निष्ठावंत असल्याचे दाखवून दिले. त्या निष्ठेचे बक्षीस त्यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तिकिटातून मिळालेले आहे. विचारे हे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. ते शिवसेनेतून (Shivsena) नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदारही झाले आहेत. निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या खासदार विचारेंना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यातच ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) गड असल्याने ते हा गड राखण्यासाठी कोणाला उमेदवारी देतात. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

2014 निवडणुकीतील मते

शिवसेना-भाजप युती अस्तित्वात होती, तर प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी Congress- NCP असा सामना रंगला होता. शिवसेना आणि भाजप पक्षाने निवडणुकीत विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या समोर राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक (Sanjiv Naik) होते. या निवडणुकीत एकूण मतदान 20,73,251 तर मतदान करणाऱ्यांची संख्या 10,54,189 एवढी होती. यात सेना -भाजप युतीचे राजन विचारे यांना 5,95,364 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना 3,14,065 मिळाली. विचारे यांनी नाईक यांचा 2,81,299 मतांनी पराभव केला. 

2019 निवडणुकीतील मते

या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विद्यमान खासदार राजन विचारे होते, तर त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे होते. 2019 रोजीच्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 23,07,090 होती, तर मतदान करणाऱ्याची संख्या 11,70,518 होती. यात राजन विचारे यांना 7,40,969 मत मिळाले, तर आनंद परांजपे (Anand Paranjape) यांना 3,28,824 मते मिळाली होती. राजन विचारे यांनी आनंद परांजपे यांचा 4,12,145 मतांनी पराभव केला होता. 

Edited By: Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT