लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीची परिस्थिती आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे अलबेल आहे, असे काही नाही. भाजपकडून शिवसेनेच्या चार जागांवर दावा ठोकला आहे. यात ठाणे, शिर्डी, दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागेचा समावेश आहे.
भाजपच्या या दाव्यावर शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रत्येक जागेवर ताकदीचा उमेदवार देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा सांगितल्याने, ते काहीसे नाराज आहेत. येथे तगडा उमेदवार देण्याची तयारी शिवसेना शिंदे गटातून सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाण्यात शिवसेनेचे खासदार राजन विचारे ( Rajan Vichare ) आहेत. ते ठाकरे गटासोबत आहेत. राजन विचारे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाकडून विनिंग उमेदवाराचा शोध सुरू आहे. भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के यांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचे निकटवर्तीय असलेल्या एका अधिकाऱ्यांचे नावही चर्चेत आहे.
ठाण्यात आज घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर, निष्ठावंत राजन विचारेंना तिकीट दिले आहे. दुसरीकडे शिंदेंच्या अर्थात, महायुतीत अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही. त्यामुळे डॉ. गेठेंनी फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती, तर प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. शिवसेना आणि भाजप पक्षाने निवडणुकीत विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या समोर राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव गणेश नाईक होते.
गेल्या निवडणुकीत मतदान किती?
एकूण मतदान - 20,73,251
मतदान करणाऱ्यांची संख्या - 10,54,189
राजन विचारे पडलेली मते - 5,95,364
राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक पडलेली मते - 3,14,065
विचारेंनी नाईकांचा 2,81,299 मतांनी पराभव केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.