Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar :आमच्या ९ आमदारांना नोटीस काढण्याचा अधिकार जयंत पाटलांना नाही; पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर ; अजितदादा

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politic's : आमच्या नऊ आमदारांना नोटीस काढण्याचा जयंत पाटील (Jayant Patil) यांना काही अधिकार नाही. शेवटी पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. (Jayant Patil has no right to issue notice to our 9 MLAs : Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. या वेळी पटेल, तटकरे, छगन भुजबळ, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमण्यात आले आहे. वास्तविक, विरोधी पक्षनेता नेमण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना असतो. सभागृह चालू असताना विरोधी पक्षातील सर्वाधिक सदस्य असणाऱ्या पार्टीचा विरोधी पक्षनेता नेमला जातो. आमच्यासोबतच्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था आणि भीती निर्माण व्हावी, यासाठी अशा गोष्टी केल्या जात आहेत, त्याला काही एक अर्थ नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही एकत्रपणे काम करीत आहोत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी काम करत राहू. महाराष्ट्राच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही काम करत राहू. आमच्याबरोबरच्या आमदारांचे भवितव्य व्यवस्थित कसे राहील. त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची, कायद्याची अडचण येणार नाही, याबाबतची खबरदारी आम्ही घेऊ, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे. त्यामुहे आम्ही जे करत आहोत, ते पक्षाच्या हिताचेच आहे. आमच्या नऊ लोकांना नोटीस काढण्याचा जयंत पाटील यांना काही अधिकार नाही. शेवटी पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार हे आपण विसरलात का. काल काही मान्यवरांनी आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार, असे म्हटले होते. मात्र, काल रात्रीपासून वेगळ्या घटना घडत आहेत. रात्री बारा बारा वाजता प्रेस घेऊन वेगळ्या घटना सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला काही अर्थ नाही. आमची भूमिका ही महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे, असेही अजितदादांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT