Jitendra Awhad, Ajit Pawar sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad on Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला; दादा मोकळ्या स्वभावाचा; मोकातील आरोपीही सोडला...

Umesh Bambare-Patil

Mumbai News : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, अजितदादा हा मोकळ्या मनाचा माणूस असून ते भोळेसुद्धा आहेत. त्यांनी उभ्या महाराष्ट्राला सांगून टाकलं की, आम्ही मोकातला माणूस सोडला... हा माणूस भोळा नसेल का, असा टोलाही त्यांनी लगावला. पोलिसांकडून मोकाही गरिबांना लावतात, पण राजकीय वशिला असेल, तर त्याला सोडूनही देतात, हेही सांगण्यात दादा विसरले नाहीत, असेही आव्हाड यांनी नमूद केले.

जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. आव्हाड म्हणाले, शरद पवार हे खूप उंचीचा माणूस आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगताच आमचे ऊर भरून आलं. पण, त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणणाऱ्यांना आता त्यांचा आदर दिसत नाही. शरद पवारांचे नाव वापरू नका, हे न्यायालयाने सांगितले आहे. मुळात शरद पवार यांनी काहीच केलेलं नाही, सर्व काही त्यांनीच केले आहे. ज्यावेळी पवारसाहेबांनी ॲग्रिकल्चर, एमआयडीसी आणली त्यावेळी ते चड्डीत फिरत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवारांनी बारामतीत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना आव्हाड म्हणाले, माझं म्हणणं आहे की, अजित पवार हा मोकळ्या मनाचा भोळा माणूस आहे. त्यांनी उभ्या महाराष्ट्राला सांगून टाकलं की आम्ही मोकातील माणसाला सोडवलं. मुळात मोकातील आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी आश्चर्य आहे. याचा अर्थ पोलिसांवर उठलेले हे बोटच आहे, असेही त्यांनी नमूद केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांकडून गरिबांना मोका लावला जातो, पण राजकीय वशिला असेल तर त्याला सोडूनही देतात, हेही सांगण्यात दादा विसरले नाहीत. अजित पवारांच्या स्वभावाचे दर्शन आहे, त्या स्वभावामुळे ते फसले आहेत. भारतात सत्ताधाऱ्यांकडून असे घडू शकते, हेही त्यांनी सांगून टाकले आहे. आमच्यावर दाखल खोटे गुन्हे काढून घेऊ शकत नाही. ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत, त्यांना आम्ही मदतही करू शकत नाही. या देशात कायदा नमविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे चालते, असाही टोला आव्हाड त्यांनी लगावला.

इन्कम टॅक्स माफ केला...

या देशात २५ हजारांचा इन्कम टॅक्स माफ केला जातो. याबाबत कोणा माणसाला नोटीस आली तर त्यांना उत्तर द्यावे लागते. मात्र, यांचं बरं आहे, त्यांनी २५ हजारांचा टॅक्स माफ केला आहे. मुख्यमंत्री कधी म्हणाले नाहीत माझे हे माफ झाले ते, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी दादांना लगावला.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT