Mahayuti Seat Sharing News : महायुतीचे जागावाटप 'या' दिवशी होणार फायनल; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Political News: पुण्यात मीडियाशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे जागावाटप 'या' दिवशी फायनल होणार असल्याचे सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election News: येत्या चार दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटपाची चर्चा युद्धपातळीवर सुरु आहे. महायुती व मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे पुण्यात मीडियाशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे जागावाटप 'या' दिवशी फायनल होणार असल्याचे सांगितले.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरू आहे. महायुतीची गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत बैठक पार पडली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह दिग्ग्ज मंडळीची हजेरी होती. मात्र, या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युलावर एकमत झाले नाही, त्यामुळे पुन्हा बैठक होणार आहे. ही बैठक सोमवारी रात्री दिल्लीत होणार असून यामध्ये महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Mahayuti Seat Sharing News)

Ajit Pawar
Solapur Politics : लोकसभेआधीच उडाला विधानसभेचा खटका; सोलापुरात कोठे-देशमुख समर्थकांत हाणामारी

सोमवारी दुपारी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दुपारनंतर दिल्लीला रवाना होणार आहेत. सोमवारी रात्री दिल्लीत महायुतीच्या रखडलेल्या जागावाटपावर चर्चा होणार आहे.

या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह दिग्ग्ज मंडळी हजेरी लावणार आहेत. मात्र, या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युलावर एकमत होऊन शिक्कामोर्तब होईल,अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, महायुतीची गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत बैठक पार पडली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार भाजपने आपल्या ३५ उमेदवारांची यादी तयार ठेवली असली आणखी एक जागा कमी करीत ३४ जागा लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ ४ जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या घटक पक्षात यावर एकमत झाले नाही. त्यामुळे पुन्हा या वर सोमवारच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे-पवार गटात मोठी अस्वस्थता

महायुतीमधील जागावाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही. शिंदेंसोबत सध्याच्या घडीला 13 खासदार आहेत. पण भाजप त्यांना 9 पेक्षा अधिक जागा सोडण्यास तयार नाही. विद्यमान खासदारांना संधी न मिळाल्यास ते पक्ष सोडून जातील, अशी भीती शिंदे गटात आहे. जिंकण्याची शक्यता आणि क्षमता यावरच जागावाटप होईल अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतली आहे. तुम्हाला अधिक जागा दिल्यास त्या जागांवर पराभवाची शक्यता वाढेल, अशी जोखीम गृहमंत्री अमित शहांनी (Amit shaha) मुख्यमंत्री शिंदे (Ekanath shinde)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत बोलून दाखवली. त्यामुळे शिंदे-पवार गटात मोठी अस्वस्थता दिसून येत आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar News : सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना प्रश्न अन् अजितदादांनी दिलं उत्तर...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com