Mumbai, 31 December : संतोष देशमुख खून प्रकरणानंतर चर्चेत आलेला वाल्मिक कराड हा आज अखेर सीआयडीसमोर शरण आला आहे. कराडच्या शरणगतीनंतर विरोधी पक्षांनी आपला मोर्चा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वळविला आहे. वाल्मिक कराड शरण आला; पण धनंजय मुंडेंचे काय असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच, ‘युती सरकारमध्ये एकटे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाहीत, चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, असे सांगून त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अंगुलीनिर्देश केला होता, त्यावर फडणवीस यांनीही भाष्य केले आहे.
वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले होते. म्हणाले की, वाल्मिक कराड हा शरण आला; पण धनंजय मुंडेंचे काय? पॉवरफुल्ल राजकारणी मंत्रिमंडळात असताना संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास पुढे कसे जाणार, असे सवाल उपस्थित केले होते.
युतीच्या सरकारमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाला सहज काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सहकारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला लागतो धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याचा निर्णय एकटे मुख्यमंत्री घेऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे. कदाचित सीएम यांनी सांगितलेही असेल, असा दावाही आव्हाड यांनी केला होता.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधकांकडून होणाऱ्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संतोष देशमुख खून प्रकरणाच्या राजकारणात मला जायचं नाही. मी पहिल्यापासून सांगतोय की, देशमुख खून प्रकरणात कोणाविरुद्धही पुरावा असेल तर द्यावा, ज्याच्या विरोधात पुरावा असेल त्याला आम्ही शोधतोय.
माझ्या दृष्टीने संतोष देशमुख खूनप्रकरणातील दोषींना शिक्षा होणे महत्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने फार फायदा होईल, असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे या प्रकरणात मला कुठल्याही राजकीय वक्तव्यात जायचं नाही. त्याचं समर्थन आणि विरोधही करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की, (स्व.) संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही देशमुख कुटुंबीयांना मिळवून देऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.