Prajakta Mali : सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीचाही मोठा निर्णय; म्हणाली, 'आमदारसाहेबांनी... '

Suresh Dhas Apology : प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, असे सुरुवातीला सांगणारे धस यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर काहींशी नरमाईची भूमिका घेतली होती. धस यांनी सोमवारी अखेर प्राजक्ता माळीविषयी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली होती.
Suresh Dhas-Prajakta Mali
Suresh Dhas-Prajakta MaliSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 31 December : संतोष देशमुख खून प्रकरणावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा उल्लेख केला होता. त्यावर प्राजक्ता माळी हिने आमदार धस यांनी जाहीर माफी मागावी, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर प्राजक्ता माळी हिनेही धस यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आवाज उठवला होता. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार असूनही त्यांनी धस यांनी ज्या तडफेने संतोष देशमुख प्रकरण लावून धरले आहे, त्यामुळे त्यांची राज्यात चर्चा आहे. मात्र, या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलटिक्सवर बोलताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींची नावे घेतली होती.

सुरेश धस यांच्या विधानानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने पत्रकार परिषद घेऊन आमदारांनी जाहीरपणे माफी मागावी, असे आवाहन केले होते. मात्र, प्राजक्ता माळी हिच्या पत्रकार परिषदेवरच संशय घेत माफी मागायला सुरेश धस यांनी नकार दिला होता. उलट प्राजक्ता माळी हिची पत्रकार परिषद ही राजकीयदृष्टया प्रेरित आहे, असे आरोप केले होते. त्यावरून राज्यात आरोप प्रत्यारोप रंगले होते.

Suresh Dhas-Prajakta Mali
Santosh Deshmukh Murder : पोलिसांवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती कुठाय? संतोष देशमुखांच्या बहिणीचा जळजळीत सवाल

याच विषयावर प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनीही फडणवीस यांची भेट घेतली होती. प्राजक्ता माळी हिची माफी मागणार नाही, असे सुरुवातीला सांगणारे धस यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर काहींशी नरमाईची भूमिका घेतली होती. धस यांनी सोमवारी अखेर प्राजक्ता माळीविषयी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली होती.

Suresh Dhas-Prajakta Mali
Kolhapur Politics : महापालिकेपासून गोकुळपर्यंत सर्व सत्तास्थाने काबीज करणारे मुश्रीफ-सतेज पाटील आता एकत्र येणार नाहीत? काय आहेत कारणे....

दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने दोन पावले मागे घेत हा वाद वाढणार नाही, याची काळजी घेतली आहे. आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मी त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर मी माझ्याकडून पडदा टाकते, असे प्राजक्ताने म्हटलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com