Jitendra Awhad - Babasaheb Purandare - Sunil Tatkare  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा, म्हणाले, " पुरंदरेंना विरोध केला म्हणून तटकरेंनी मला...!"

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती. आरोप- प्रत्यारोपांच्या दाव्यांनंतर राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.आता पुन्हा एकदा पुरंदरेंवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत खटके उडण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविषयी खळबळजनक दावा केला आहे. त्यात पुरंदरेंना विरोध केल्यानंतर तटकरेंनी मला दम भरला होता, असा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या पत्रकार परिषदेत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ते म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांना मी विरोध केला तेव्हा मला खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) विरोध करत दम दिला होता, असे आव्हाड यांनी सांगितले. या दाव्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले...?

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. मराठ्यांच्या विरोधातील चुकीचा इतिहास लिहिला असल्यामुळे मी त्याला विरोध केला. त्यावेळी तटकरेंनी मला दम देत बोलू नको सांगितलं होतं, असा दावा करून आव्हाडांनी खळबळ उडवून दिली आहे.

तसेच तटकरेंनी या लिखाणाला विरोध तर केलाच नाही उलट मलाच वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिला होता, पण पवारसाहेबांशी या प्रकरणावर बोललो आणि त्यांनी माझं वक्तव्यं मागे घेतलंच पाहिजे, असं नाही असं सांगितलं. याचवेळी शरद पवारांनी मला मी तुझ्या पाठीशी आहे, तुला जे बोलायचं ते बोल असं ठामपणे सांगितलं होतं, असेही आव्हाड म्हणाले.

"...त्यावेळी मी अजिबात चुकलेलो नाही !"

मी पुरंदरे यांच्याबाबतीत अजिबात चुकलो नाही. त्यांचं पुस्तक वर्णव्यवस्थेवर अवलंबून होते. मात्र, तुम्ही पुरंदरे यांची बाजू घेतली होती. तुमचा जी आर कामाचा काय? जाट, गुजर ही दोन मोठी आंदोलनं झाली. मराठ्यांना तुम्ही नुसती आश्वासनं देत आहात, असा हल्लाबोलही आव्हाडांनी केला.

" तुम्हाला जी पदं मिळाली ती..."

खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याबद्दल सुनील तटकरेंनी मी क्षुद्र असल्यामुळे माझ्यावर टीका होत असल्याचे म्हटले होते. यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तटकरेंनी असं बोलताना जरा मागे वळून बघितलं असतं, तर तुम्हाला जी पदं मिळाली ती चांगल्या चांगल्या घराण्यांना मिळाली नसल्याचे दिसून आलं असतं.

आदिती तटकरेंना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून शेकापने साहेबांच्या शब्दामुळे बनवलं. तुम्हाला मंत्रिपद, पुतण्या, मुलगा, भाऊ, सगळ्यांना आमदारकी दिली, तुम्हाला खासदारकी दिली. मला न देता तुमच्या मुलीला पालकमंत्रिपद दिलं, असा टोलाही आव्हाडांनी या वेळी तटकरेंना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT