Kalyan Dombivili Palika  Sarkarnama
मुंबई

Kalyan Dombivli : आयुक्त दालनाबाहेर राडा! पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षारक्षकांनी केली मारहाण

Kalyan Dombivli Corporation : मारहाण झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Bhagyashree Pradhan

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली महापालिका ( Kalyan Dombivli ) आयुक्तांच्या दालनाबाहेर पालिका कर्मचारी मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यानं केला आहे. या घटनेमुळे पालिका आयुक्त दालनाबाहेर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

रमेश पौळकर असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांना सुरक्षारक्षक अधिकारी सुरेश पवार आणि महिला सुरक्षारक्षक सरिता चरेगावकर यांनी मारहाण केल्याचा आरोप पौळकर यांनी केला आहे. पौळकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर पालिका अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो, असं म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवारी पालिका आयुक्तांना नागरिक भेटतात. अनेक नागरिकांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारी आणि अर्ज असतात. नागरिकांना पालिकेच्या गेटवर टोकन विचारून सोडलं जातं. मंगळवारी या रांगेत पालिका कर्मचारी रमेश पौळकर हेदेखील होते. पौळकर एका कामगार संघटनेत काम करतात. पालिका आयुक्तांशी कामगारांच्या समस्यांबाबत पौळकरांना चर्चा करायची होती.

पण, या वेळी सुरक्षारक्षक अधिकारी सुरेश पवार आणि महिला सुरक्षारक्षक सरिता चरेगावकर यांनी मारहाण केल्याचा आरोप पौळकरांनी केला. पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर घडलेल्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर काही वेळेसाठी पौळकरांना आयुक्तांच्या दालनाबाहेर बसवून ठेवलं.

त्यानंतर पौळकरांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत महापालिका सामन्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवेंनी ही घटना आयुक्त दालनाबाहेर घडल्याचं सांगत बोलण्यास नकार दिला. त्यासह सुरक्षारक्षक अधिकारी पवार आणि महिला सुरक्षारक्षक चरेगावकर यांनीही याविषयी काही बोलण्यास नकार दिला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT