Kalyan-Dombivli Sarkarnama
मुंबई

Kalyan-Dombivli Budget : कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना राष्ट्रगीताचा विसर; बजेटमध्ये मागील घोषणांची पूर्तता नाही...

Bhagyashree Pradhan

Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड यांनी पालिकेचे 700 कोटी रुपयांच्या वाढीचे बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये कल्याणकरांच्या करात वाढ झाली नसली तरी मागीलवर्षी केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नसून नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन आयुक्तांची पोतडी घोषणांनी भरलेली असली तरी ती फाटलेली नसावी, अशी अपेक्षा कल्याण डोंबिवलीकर करत आहेत.

या बजेटमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सामान्य माणसांना अधिक महत्त्व दिल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले. मात्र बजेट सादरीकरणासाठी आयोजित केलेल्या सभेच्या आधी राष्ट्रगीत न घेताच आयुक्तांनी बजेटचे सादरीकरण केल्याने आयुक्तांना राष्ट्रगीताचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले.

डोंबिवली (Dombivli) पश्चिम मोठा गाव ठाकुर्ली येथे रेल्वे फाटक आहे. त्याऐवजी उड्डाणपूल बांधणे, कोपरी उड्डाणपूल येथे समांतर पूल बांधण्याकरता नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिव्यांगांसाठी दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत महापालिकेमार्फत मासिक पेन्शन व विविध उपक्रम राबविण्यासाठी 12 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

स्वमग्न मुलांसाठी मौजे बारावे येथे एक उद्यान उभारण्यात येणार असून येथे ऑटीझम व्हीलेज उभारण्यात येणार आहेत. येथे स्वमग्न मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात (Budget) करण्यात आली आहे.

उद्यान व वृक्ष संवर्धन विभगाकरिता 17.21 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्यावर्षी पेक्षा 10 कोटीने जास्त आहे. यामध्ये मियावाकी जंगलाची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि छोटी मुले आणि सामान्य नागरिकांना फिरण्यासाठी उद्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेअंतर्गत 2 निवारा केंद्र आहेत. यासाठी 1 कोटीची तरतूद केली असून विठ्ठलवाडी येथे आणखी एक निवारा केंद्र उभे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महिलांसाठी सुविधा...

महिलांसाठी एक वसतिगृह उभारण्यात येणार असून महापालिका शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वियार्थिनिंसाठी नीट, जेईई, या परीक्षेसाठी एमपीएससी आणि युपीएससी अशा स्पर्धा परीक्षांसाठी महिलांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदूषण मुक्त प्रवासाचा संकल्प...

भिवंडी, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपरिषद अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव सामन्यांसाठी फायदेशीर असून दरात देखील नक्कीच फरक पडेल.

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर हा संपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. याचा आर्थिक भार देखील पाचही नगरपालिकेवर पडणार आहे. यामध्ये प्रत्येक पालिकेला 3 महापालिकांना 100 ई-बसेस देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त कल्याण - डोंबिवलीच्या 207 ई-बसेस अशा एकूण 507 ई-बसेसचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुढील दहा दिवसात पाच ई-बसेस धावतील असे आयुक्तांनी सांगितले. तर चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

हिंदी भाषा भवन, वारकरी भवन आणि आगरी कोळी भवन यांचा उल्लेख केला बजेटमध्ये करण्यात आला आहे. तसेच वेळेत बिलं न पोहचल्याने पालिकेच्या कारवार परिणाम होतो. यामुळे नागरिक देखील वेळेत कर भरू शकत नाहीत, असे होऊ नये म्हणून आयुक्त इंदुराणी जाखड यांनी बचत गटाच्या महिलांतर्फे घरोघरी बिलं पोहचवण्याची नवीन युक्ती शोधून काढली आहे.

शेवटी आयुक्त जाखड यांनी पालिकेचा 2024-2025 सालाचा सुधारीत अंदाज शिल्लक रु. 3282.53 कोटीची जमा व रक्कम रु. 3182.28 कोटीच्या खर्चाचे आणि रक्कम रु. 25.00 लक्ष शिल्लक मुळ अंदाज सादर करीत या आर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT