Maharashtra Budget 2024 : आचारसंहितेचा 'फास', खरिपाचा 'त्रास', उन्हाळ्याच्या 'झळा', तरी दादांना महायुतीचा 'ध्यास'

Loksabha Election Code of Conduct : अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना आचारसंहितेचे पालन करत राज्याला खर्चाचे नियोजन करावे लागेल. अन्नदाता, विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, श्रमिक आणि महिलांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात काय असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. अंतरिम अर्थसंकल्प आज दुपारी सादर होईल.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याचा सन 2024-2025 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज दूपारी 2 वाजता विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे दूसऱ्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राज्यातील जनतेला दिलासा देणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. लोकसभा निवडणुकांमध्ये या अंतरिम अर्थसंकल्पातील काही मुद्दे हे मतदारांना प्रभाव टाकणारे असतील की नाही हे मात्र आज दुपारानंतर निश्चित होईल.

पुढील काळात दोन निवडणुकांचा कार्यक्रम पाहता त्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा आणि बेरोजगार युवकांना आधार, महिलांना प्राधान्य, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करणारा, त्याच बरोबर श्रमिकांना न्याय देणारा हा अंतरिम अर्थसंकल्प राहू शकतो. या अंतरिम अर्थसंकल्पात गारपिट, दुष्काळ, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकार मदत घोषित करु शकते.

1 एप्रिल ते 31 जुलै या चार महिन्यासाठी आवश्यक खर्चाची तरतुद आज करण्यात येईल. निवडणुकानंतर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प (Budget) हा जून- जुलै मध्ये सादर होण्याची शक्यता आहे. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात खुप मोठ्या घोषणा होण्याची शक्यता नाही. पण, अन्नदाताच्या हिताला प्राधान्य देण्याची शक्यता आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात असेल.

या काळात येणाऱ्या खरिप कृषी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक ती पावले राज्य सरकार उचलेल. तशीच या अंतरिम अर्थसंकल्पात मांडणी असेल. अंतरिम अर्थसंकल्पात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) बीज पेरणी असेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या घोषणांचा शंखनाद नसला तरी लोकहिताला प्राधान्य निश्चित दिल्या जाईल.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Kolhapur Politics : आता सुट्टी नाही; खासदार पुत्राने घेतली राजकारणात एन्ट्री!

अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुढील चार महिनांच्या कालावधीत दादा राज्याचा गाडा कसा हाकतात हे देखील आज पाहण्यासारखे ठरेल. आज राज्य सरकार पुढील काळात येणारे खर्च आणि व्याज यांची तरतुद करेल. इतक्यावर राज्य सरकार थांबणार नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा खर्च त्याच बरोबर शासनाचे इतर कर्जाचे हप्ते, व्याज आदींची तरतुद या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात येईल.

2014 मध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसकंल्प सादर केला होता. यंदा त्यांचा हा दूसरा अंतरिम अर्थसंकल्प आहे. तर या पुर्वी 2004 मध्ये जयंत पाटील, 2009 मध्ये दिलीप वळसे पाटील तर 2019 मध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकसभा निवडणुक वर्षात अशा प्रकारे अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरी मतदारांवर महायुती सरकारची छाप टाकण्यासाठी नगर विकास विभागाला भरिव निधी या अंतरिम अर्थसंकल्पात दिसून येईल. त्याच बरोबर विविध सामाजिक योजनांची तरतुद, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व वसतीगृहासाठी तरतुद, विविध योजनांच्या अनुदानाची तरतुद आणि वाढ दिसून येऊ शकते. कृषी, सिंचन, कृषी विद्यापीठांसाठी आवश्यक तरतुद, बीजोत्पादन प्रकल्प, खरिप हंगामपुर्व नियोजन, त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी खते, बियाणे, किटकनाशक यांची उपलब्धता शासन स्तरावर सुनिश्चित केली जाईल. यातून अन्नदात्याला दिलासा देण्याचा प्रयत्न अंतरिम अर्थसंकल्पात दिसून येईल.

विशेष म्हणजे पुढील काळातील उन्हाळा आणि पाणी टंचाई, त्याच बरोबर विंधन विहिर निर्मिती, टँकर यांच्या विषयीची आर्थिक तरतुद करुन ठेवावी लागेल. राज्यात काही भागात अतिवृष्टी व काही भागात दूष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता तसेच तोंडावर असलेला उन्हाळा पाहता राज्य सरकार निश्चितच त्या दृष्टीने तयारी केल्याशिवाय राहणार नाही.

उन्हाळ्यात राज्यातील जनतेला पाणी टंचाईच्या झळा पोहचल्या तर त्याचा थेट परिणाम हा मतदानाच्या टक्केवारी होऊ शकतो. हा दूरदृष्टीकोन राज्य सरकारचा पुढील काळात राहिल. त्यामुळे राज्यात कुठे ही पाणी टंचाईची ओरड होणार नाही याची दक्षता घेतली जाण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती, शेती कर्ज यांची पुरेपुर तरतुद आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात असेल.

(Edited by Amol Sutar)

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde : "...म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, मी कार्यक्रम करतो", शिंदे गटातील मंत्र्यांचं स्पष्टीकरण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com